रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माज

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल
राष्ट्रपती रायगड दौर्‍यानिमित्त हेलिपॅडला विरोध झाल्याने राष्ट्रपती गडावर ’रोप वे’ ने जाणार
तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत तीन घरफोडीच्या घटनाची नोंद 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी उपाध्यक्षा रुपाली पाटील – ठोंबरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार यांनी रुपाली पाटील – ठोंबरे यांचे पक्षात स्वागत केले.
रुपालीताई पाटील – ठोंबरे यांचा राजकीय प्रवास मागील अनेक वर्षांपासून पाहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करताना अनेक सामाजिक प्रश्नांवर लक्ष दिले आहे. पण मनसे पक्षाने दुजाभाव करत त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखले. मनसे पक्षाचा प्रभाव पुणे शहरात वाढविण्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेतल्या होत्या. पण त्यांच्या उल्लेखनीय कामाला डावलले गेले असेही अजितदादा पवार म्हणाले. आदरणीय शरद पवारसाहेबांनी महिलांना मिळवून दिलेल्या आरक्षणातूनच आपल्या पक्षात आपण अनेक महिलांना संधी देऊ शकलो. यातूनच खासदार सुप्रियाताई सुळे, वंदना चव्हाण, रुपालीताई चाकणकर अशा अनेक भगिनींना राजकीय वाटचालीत आपण पुढे आणू शकलो. अशाच प्रकारे रुपाली पाटील – ठोंबरे यांनादेखील पक्ष योग्य ती जबाबदारी देईल, असा विश्वास अजितदादा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी रुपाली पाटील – ठोंबरे यांच्यासह लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनीषा सरोदे, मनिषा कावेडीया, प्राजक्ता पाटील, प्रिया पाटील, निशा कोटा यांचेही अजितदादा पवार यांनी पक्षात स्वागत केले. यादरम्यान मालेगाव शहराध्यक्ष असिफ शेख यांच्या पुढाकाराने भाजपा, जनता दल, एमआयएम या पक्षांमधून अब्दुल माजीद चमडेवाले, अन्सारी अकील, शर्जील अन्सारी, बिलाल बिल्डर, अन्सारी नईम अहमद, अन्सारी शोएब अहमद, सोहेल अख्तर, अबुझर अन्सारी, फरीद अहमद, दरगाही फन्वाद, दरगाही फहाद, अतुल सुर्यवंशी, मन्सूर अख्तर उस्मान गणी, रईस उस्मानी यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

COMMENTS