Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकन्याय यात्रेच्या यशस्वीतेसाठी जनजागृती अभियान

नेवासा फाटा : तालुक्यात विधानसभा निवडणुकीत आजी माजी लोकप्रतिनिधींना शह देण्यासाठी नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या लोकशक्ती आघाडीकडून येत्या एक ऑग

पंतप्रधान मोदींना पाठवल्या नगरमधून शेणाच्या गोवर्‍या
समाजकंटकाने पुस्तकांचे गोडावून दिले पेटवून
नेवाश्यात अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई

नेवासा फाटा : तालुक्यात विधानसभा निवडणुकीत आजी माजी लोकप्रतिनिधींना शह देण्यासाठी नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या लोकशक्ती आघाडीकडून येत्या एक ऑगस्ट पासुन तालुक्यात लोकन्याय यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकशक्ति आघाडीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व सदस्य हे तालुक्यातील प्रत्येक गावाचा दौरा करणार आहेत.
यावेळी घरोघरी जाऊन सामान्य माणसाच्या, शेतकर्‍यांच्या, तरुणांच्या महिलांच्या, तसेच गावातील समस्या जाणून घेणार आहेत. या यात्रेच्या पूर्वतयारी साठी व यशस्वीतेसाठी आघाडीकडून महत्वाच्या गावात जावून जनतेच्या गाठीभेटी घेवून लोकांना. यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज आघाडीकडून तालुक्यातील पाचेगाव गणात प्रतेक गावात जावून जनतेला यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी पूनतगाव येथील माजी जील्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांना निमंत्रण देण्यात आले. यावेळी दिलीप वाकचौरे यांनी लोकन्याय् यात्रेत सहभागी होणार असे स्पष्ट करत येणार्‍या विधानसभा निवडणुकीत लोकशक्ती आघाडीची भूमिका ही महत्वाची ठरणार असून. मी स्वतः लोकशक्ती आघाडीत सहभागी होणार आहे असे स्पष्ट केले. यावेळी लोकशक्ती आघाडीचे सुरेश शेटे, सादिक शिलेदार, संभाजी माळवदे, संदिप अलवने, राजूभाऊ आघाव, गणपत मोरे, आदी उपस्थित होते.

COMMENTS