नगर (प्रतिनिधी)-शहरातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी (दि.11 जुलै) रोजी बेवारस वाहनांच्या मुद्देमालाचा उघड लिलावचे आयोजन करण्यात आले आ
नगर (प्रतिनिधी)-
शहरातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी (दि.11 जुलै) रोजी बेवारस वाहनांच्या मुद्देमालाचा उघड लिलावचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक भंगार विक्रेत्यांनी सदर लिलावात सहभागी होण्यासाठी सोमवार (दि. 7 जुलै) रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत संबंधितांकडे अनामत रक्कम जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या आवारात एकूण 18 दुचाकी, 5 तीन चाकी रिक्षा, 7 चार चाकी वाहन असे एकूण 30 बेवारस वाहने व त्यांचे सांगडे बऱ्याच दिवसापासून पडून खराब होत आहे. सदरची वाहने पोलीस ठाण्याचे आवारात बऱ्याच दिवसापासून पडून राहिल्याने जागेची अडचण निर्माण झाली आहे. या वाहनांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून लिलावाच्या अनुषंगाने मूल्यांकन करण्यात आलेले आहे.
याबाबत तहसीलदार नगर यांना पत्रव्यवहार करून त्यांनी वाहनांचे उघड लीलाव करण्याची परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी 11 जुलै रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे उघड लिलावचे आयोजन करण्यात आलेले आहे.
इच्छुक भंगार विक्रेत्यांना सदर लिलावात सामील होण्यासाठी अटी व शर्तीचे पालन करून अनामत रक्कम 5 हजार रुपये सोमवारी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत संबंधितांकडे जमा करावयाचे आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीस शासनमान्य भंगार विक्रेता परवाना, नावानिशी जीएसटी नंबर, महापालिकेचा शॉप ॲक्ट परवाना, उद्यम आधार प्रमाणपत्र आवश्यक आहे. चढ्या भावाने बोली लावण्यात येणार असून, सर्वाधिक बोलीवर भंगार लिलावातील वाहने अदा करण्यात येणार आहे.
ही रक्कम रोख स्वरूपात जागेवरच पोलीस ठाण्यात जमा करावी लागणार आहे. सदर लिलावात सहभागी होणारे भंगार विक्रेत्यांकरिता इतर अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल व्ही.एन. राठोड 9834936105 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.


COMMENTS