Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर मधील नद्यांच्या संवर्धन व सुशोभीकरण निधी द्या : आ. सत्यजीत तांबे

अहिल्यानगर :संगमनेर मधील प्रवरा, म्हाळुंगी आणि आधाळा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. या नद्यांच्या संवर्धन, सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी भरीव निधी

पुण्यातील सात मंडळांचे बाप्पा एकाच रथात विराजमान होणार
कुठे अडविले, कुठे तोडले बॅरिकेटस्
फलटण तालुक्यात वाघाटी मांजराचा वावर; मादीसह तीन पिल्लांचे दर्शन

अहिल्यानगर :संगमनेर मधील प्रवरा, म्हाळुंगी आणि आधाळा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. या नद्यांच्या संवर्धन, सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.
वाढतं नदीकाठचे शहरीकरण, प्रक्रीया न झालेले सांडपाणी तसेच नद्यांमध्ये सोडले जाणे, नदीपात्रात कचरा टाकणे यामुळे नद्यांमध्ये प्रदूषण वाढलं आहे. त्यामुळे नद्यांचा ‘अमृतवाहिनी नदी पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्प’ अंतर्गत विकास आणि पुनरुज्जीवन करावे. या नद्यांच्या संवर्धन, सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा. यासाठी नगर पालिकेने राज्य सरकारला साडे तीनशे कोटी निधीचा प्रस्ताव दिल्याचे आ. तांबेंनी स्पष्ट केले. आ. तांबे म्हणाले की, महाकुंभ मेळ्यास एक – दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. तसेच संगमनेरचा हा परिसर दंडकारण्याचा असल्याने येथे हजारो पर्यटक येत असतात. या नद्यांच्या सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने साडे तीनशे कोटीचा निधी संगमनेर नगर पालिकेला द्या. या माध्यमांतून संगमनेर मधील धार्मिक, सामजिक आणि शैक्षणिक विकास करण्यास मदत होणार आहे. यापूर्वी देखील आ. सत्यजीत तांबेंनी नद्यांच्या विकासासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी भेट घेऊन मागणी केली होती.

COMMENTS