Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला सोयी-सुविधा द्या

आमदार प्रा. शिंदेंनी वेधले कृषीमंत्री मुंडे यांचे लक्ष

जामखेड ः जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयातील अपूर्ण मुलभूत सोयी सुविधा पुर्ण करण्यासाठी आ प्

अभिनेता करण वाही याला जीवे मारण्याची धमकी ; साधूंविषयी कमेंट पडली महागात | Lok News24
कोपरगाव तालुक्याची शांतता भंग होउ देउ नका
BREAKING: अहमदनगर मध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ | Ahmednagar Coronavirus | LokNews24

जामखेड ः जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयातील अपूर्ण मुलभूत सोयी सुविधा पुर्ण करण्यासाठी आ प्रा.राम शिंदे यांनी राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. कृषि महाविद्यालयातील मुलभूत सुविधा व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. आमदार प्रा.राम शिंदे यांच्याच पुढाकारातून जामखेड तालुक्यातील हळगाव येथे 100 एकर जागेत 65 कोटी रूपये खर्चाच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाला सरकारने मंजुरी दिली होती.  महाविद्यालयाचे काम पुर्ण होऊन गेल्या वर्षीपासून हळगाव येथे कृषि महाविद्यालयाचे वर्ग नियमितपणे भरवले जाऊ लागले आहे. मात्र पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय हे नवीन असल्यामुळे या ठिकाणी अनेक मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात यासंबंधी आवाज उठवला होता. याबाबतचे निवेदन त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना दिले होते. आमदार प्रा.राम शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांची आज भेट घेतली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाच्या वीज पाणी व इतर मुलभूत सोयी सुविधांच्या प्रश्‍नाकडे त्यांनी कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी मुंडे यांना निवेदन दिले.या निवेदनासोबत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून हळगाव कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरच सुटणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

COMMENTS