Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सार्थ अभिमान आहे-मुर्गाप्पा खुमसे

लातूर प्रतिनिधी - आपल्या देशाची संस्कृती ही जगातील इतर देशासाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्राची परंपरा ही गौरवशाली आहे कारण येथे

राज्यात होणार ऑलिम्पिक भवन
’मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा
शिंदे सरकारमध्ये कोणी ही नाराज नाही – मंत्री अब्दुल सत्तार 

लातूर प्रतिनिधी – आपल्या देशाची संस्कृती ही जगातील इतर देशासाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्राची परंपरा ही गौरवशाली आहे कारण येथे कामगार आणि स्वातंत्र्य सैनिकाचा मोठ्या प्रमाणात गौरव केला जातो असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा खुमसे यांनी बोलताना व्यक्त केले.  
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा खुमसे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ.बाळासाहेब गोडबोले आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.   यावेळी संगीत विभागातील प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंद पवार आणि विद्यार्थिनींनी गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत सादर केले. यावेळी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची परंपरा ही गौरवशाली आहे. आज कामगाराच्या सन्मानाचा दिवस असून महाराष्ट्र दिन सुद्धा आपण उत्साहामध्ये साजरा करत आहोत असे सांगून त्यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांमध्ये पोलीस दलामध्ये पोलिस म्हणून नियुक्ती झालेल्या लखण कावाळे, हेमचंद्र सांडूर, विशाल गंभीरे तर चालक म्हणून नियुक्त झालेल्या कांत भुसे, रोहित बिराजदार यांचा तसेच राज्यस्तरीय ज्युदो शालेय 55 किलो वजन गट क्रीडा स्पर्धेमध्ये बाळासाहेब जमादार यांना सुवर्णपदक, 73 किलो वजन गटामध्ये शंकर कतलाकुटे याला कास्य पदक, तसेच 67 किलो वजन गटामध्ये समाधान भोसले याला रौप्य पदक आणि स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये विष्णू तातपूरे यांनी कास्य पदक प्राप्त केल्याबद्दल या सर्वांचा स्मृतीचिन्ह आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धोंडीबा भुरे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ.राजकुमार लाखादिवे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

COMMENTS