Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर / प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कणेरी येथील सिध्दगिरी मठावर आले होते. त्यांना अडवण्यासाठी निघालेल्या मराठा आंदोलकांना राजारामप

खा.चिखलीकर यांच्या हस्ते ’हर घर जल’ योजनेचा बेंद्रीत शुभारंभ
बियाणे, खाते खरेदी करताना शेतक-यांनी दक्षता घ्यावी
हिंगोलीत विद्युत अभियंत्यांवर फेकली चप्पल

कोल्हापूर / प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कणेरी येथील सिध्दगिरी मठावर आले होते. त्यांना अडवण्यासाठी निघालेल्या मराठा आंदोलकांना राजारामपुरी पोलिसांनी आज ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. मुख्यमंत्री शिंदे परत गेल्याची खात्री झाल्यावर आंदोलकांना सोडण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मराठा आरक्षणप्रश्‍नी मंत्री, आमदार-खासदारांना ठिकठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. शुक्रवारी (ता.27) सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही कार्यकर्त्यांनी अडवले आणि आपण कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहन केले. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौर्‍याची गुप्तता ठेवण्यात आली होती. रात्री आठ वाजता ते कणेरी येथील सिध्दगिरी मठावर आले होते. मात्र, याची कुणकुण मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना लागली होती. सर्व कार्यकर्ते अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांच्या घरामध्ये एकत्र जमले होते. विमानतळ किंवा सिध्दगिरी मठ येथे जाऊन मुख्यमंत्र्यांना अडवायचे आणि मराठा आरक्षणप्रश्‍नी जाब विचारायचा, असे त्यांचे नियोजन होते. याची माहिती मिळाल्यावर राजारामपुरी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यांच्या पायर्‍यांवरच ठिय्या मारला आणि घोषणाबाजी सुरू केली.

अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, मुख्यमंत्री जनतेचे सेवक आहेत. जनतेला तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही तर त्यांना आमच्याकडे घेऊन या. मराठा आरक्षणप्रश्‍नी त्यांनी आम्हाला उत्तर दिले पाहिजे. या वेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस बंदोबस्त तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पोलिस निरीक्षकांच्या कक्षात बसवले. मुख्यमंत्री कोल्हापुरातून निघून गेल्याची माहिती मिळाल्यावर आंदोलकांना सोडून दिले.

यावेळी वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, विजय देवणे, दिलीप देसाई, बाबा पार्टे, विकास सुर्वे, प्रसन्न शिंदे, सुभाष जाधव, संजय जाधव, काका जाधव, दुर्गेश लिंग्रस, प्रसाद जाधव, कमलाकर जगदाळे, शाहीर दिलीप सावंत, उदय लाड, अनुप पाटील, अमर निंबाळकर, संजय पवार, दिनेश कुकडोळकर, विजय घाडगे, सागर धनवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS