मुंबई ः पालघर जिल्ह्यातील होऊ घातलेल्या वाढवण बंदर विरोधात पालघर मधील 25 पेक्षा अधिक संघटना येत्या 22 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा का
मुंबई ः पालघर जिल्ह्यातील होऊ घातलेल्या वाढवण बंदर विरोधात पालघर मधील 25 पेक्षा अधिक संघटना येत्या 22 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आता त्याच दिवशी चारोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी वाढवण बंदराच्या सर्व मान्यता प्राप्त झाल्या असून याच महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नॅशनल फिश वर्क फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती समाज संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, समुद्र बचाव मंच, समुद्रकन्या मंच सातपाटी, कष्टकरी संघटना, भूमी सेना व आदिवासी एकता परिषद व इतर समस्त बंदर विरोधी संघटना यांनी या बंदराला तीव्र विरोध दर्शवला आहे. येत्या 22 फेब्रुवारी रोजी चारोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार असल्याचे बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत यांनी सांगितले. तसेच 25 तारखेला पश्चिम किनारपट्टीवरील सर्व भूमिपुत्र हे किनार्यावर एकत्र येत मानवी साखळी करून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार आहेत. त्यामुळे वाढवण बंदराचा संघर्ष हा अधिकच तीव्र होताना दिसून येत आहे
COMMENTS