Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

  अहमदनगर प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर टोल नाका कर्मचाऱ्यांनी आंदोलन क

संगमनेर तालुक्यात महिलेचा खुन; आरोपीस अटक
६५ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप
शेवगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पाथर्डीत पाळला बंद

  अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर टोल नाका कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. टोल प्लाजा कामगार वेल्फेअर असोसिएशन यांनी संपाचे आयोजन केले होते. टोल कामगारांना नियमित करण्यात यावे व त्यांची वेतनश्रेणी गेले 2007 पासून वाढवली नाही. ती वेतनश्रेणी वाढवुन द्यावी, सर्व कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम देण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी टोल प्लाजा कंपनीला दिले आहे. येणाऱ्या काळामध्ये टोल प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल. यावेळी कार्याध्यक्ष विलास राहणे, स्वप्निल भालेराव, संतोष पोखरकर, संतोष राणे, बाळासाहेब ढगे, गौरवणे शिवाजीने, तुषार पावशे, किसनवाळे, आजी-माजी युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या एक दिवशी आंदोलनात सहभागी झाले होते.

COMMENTS