Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवार साहेब यांच्या घरावरील हल्ल्याचा पाटणमध्ये निषेध

पाटण : प्रांताधिकारी सुनील गाढे यांना निवेदन देताना सत्यजितसिंह पाटणकर व कार्यकर्ते. पाटण / प्रतिनिधी : आमचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत किर-किर; भाजपमध्ये उकळ्या
पाठीत खंजीर खुपसण्याचे शिवाजीराव नाईक यांचे काम : राहुल महाडीक
भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही

पाटण / प्रतिनिधी : आमचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचारी आंदोलनकर्त्यांच्या आडून केलेला भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय आहे. पाटण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. यातील दोषींंवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
खा. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाटण येथे काढलेल्या निषेध मोर्चादरम्यान ते बोलत होते. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अध्यक्ष व पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, सातारा जिल्हा डोंगरी विकास समितीचे सदस्य शंकर शेडगे, पाटण दुध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे, पाटण नगराध्यक्षा सौ. मंगल कांबळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, एसटी कर्मचारी संपाबाबत खा. शरद पवार यांनी पहिल्यापासून सकारात्मक भूमिका घेऊनही कोणाच्यातरी चुकीच्या चिथावणीने काही समाजकंटकांनी खा. पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करून गोंधळ घातला. या घटनेचा पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत आहे. महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचारी संप काळात चर्चेची, समन्वयाची भूमिका घेऊनही काही मंडळी कोणाच्यातरी चिथावणीने, न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याऐवजी कायदा हातात घेऊन ज्येष्ठ नेत्यांच्या घरावर दगडफेक कसे करु शकतात. इतके दिवस हे एसटी कर्मचारी शांततेत आंदोलन करत होते. परंतू अचानक या आंदोलनाला हिंसक वळण काही लोकांनी दिले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून आंदोलनकर्त्यांना भडकवणार्‍या त्या चिथावणीखोरांना तत्काळ अटक करण्यात यावी. दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादीचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला. यावेळी युवक अध्यक्ष गुरुदेव शेडगे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, विजय शिंदे, बबन पवार, रंगराव जाधव, अंकुश मोंडे, संजय हिरवे, रविराज पाटील, निवास पाटील, नगरसेवक, नगरसेविका, सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भातील निवेदन पाटण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांना देण्यात आले.

COMMENTS