Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

तीन महिलांची पुणे पोलिसांनी केली सुटका

पुणे/प्रतिनिधी ः धानोरी परिसरातील महादेवनगर याठिकाणी पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट पोलिसांच्या छाप्यात उ

देवदर्शनावरुन परततांना 7 भाविकांचा मृत्यू
जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आ. गडाखांचे आध्यात्मीक विकास कामात मोठे योगदान

पुणे/प्रतिनिधी ः धानोरी परिसरातील महादेवनगर याठिकाणी पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेश्याव्यवसायातून तीन महिलांची सुटका केल्याची माहिती बुधवारी दिली आहे.
याप्रकरणी महिला पोलिस हवालदार मनीषा सुरेश पुकाळे यांनी आरोपीं विरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे. याप्रकरणी रंजना सनातून सिंगदेवी (वय-35, राहणार-धानोरी, पुणे, मूळ राहणार आसाम) या महिलेस अटक करण्यात आली आहे. साथीदार सुरेश शाहू आणि पूजा पवार यांच्यावर भादवि कलम 370 ,34 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम तीन, चार, पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धानोरीतील महादेवनगर या ठिकाणी गुडविल स्क्वेअर येथील प्रीमियम युनिक सलून मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर माहिती बाबत खातरजमा करत, संबंधित पाच सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी पीडित तीन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. संबंधित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका आरोपी भागविताना मिळून आलेले आहेत. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस ढवळे पुढील तपास करत आहे.

COMMENTS