Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोखंडी सावरगाव येथे ‘नर्सिंग हब’ उभारण्याचा प्रस्ताव; विविध कोर्सेस सुरू करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांची आग्रही मागणी

केज : नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने

आ.नमिताताई मुंदडांच्या पाठपुराव्याला यश
आ.नमिताताई मुंदडा यांच्या निधीतून शिरपुर्यात सभामंडपाचे भूमिपूजन; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
अंबाजोगाईत विविध विभागांचा महा-आढावा

केज : नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. लोखंडी सावरगाव येथील परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात विविध नर्सिंग कोर्सेस सुरू करून या ठिकाणाला नर्सिंग शिक्षणाचे केंद्र (नर्सिंग हब) म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या प्रस्तावाला शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. सुरू करण्याची मागणी असलेले कोर्स लोखंडी सावरगाव येथील प्रशिक्षण संस्थेत पुढील नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे – एएनएम (सहाय्यक नर्स मिडवाइफ) जीएनएम (जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी) बालरोग नर्सिंग  (बालरोग परिचर्या) बी.एस्सी. नर्सिंग  (पदवी अभ्यासक्रम)  एम.एस्सी. नर्सिंग (पदव्युत्तर अभ्यासक्रम) ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी या कोर्सेसना मान्यता मिळाल्यास स्थानिक मुला-मुलींना नर्सिंग शिक्षणासाठी शहरांकडे जावे लागणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आरोग्य व्यवस्थेलाही होणार फायदा  तज्ज्ञ परिचारिका तयार झाल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढेल. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. आ. मुंदडा म्हणाल्या, ग्रामीण भागातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणासाठी शहरात जावे लागते. लोखंडी सावरगाव येथे सर्व अभ्यासक्रम सुरू झाले, तर आरोग्य क्षेत्राला मोठे मनुष्यबळ मिळेल. शासनाने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी. दरम्यान, या मागणीमुळे बीड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS