Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितसमोर 4 जागांचा प्रस्ताव

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची माहिती

मुंबई ः गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. असे असतांना जागा वाटपासंदर्भात

Sanjay Raut on IT Raid : अपना भी टाईम आयेगा… (Video)
शिंदे गटात लवकरच स्फोट होईल
वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही 

मुंबई ः गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. असे असतांना जागा वाटपासंदर्भात बोलतांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणाला पाडत नाही आम्हाला भाजपला पाडायचे आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात काही चर्चा करणे गरजेचे आहे तर आम्ही स्वतंत्रपणे करू. आम्ही कोणालाही एकमेकांना निमंत्रण घेऊन बोलवत नाही, महाविकास आघाडी हे कुटुंब आहे प्रत्येकाने कधीही येऊन त्या बैठकीत चर्चेत सामील होऊ शकता, असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उद्या जर आम्हाला वाटले की प्रकाश आंबेडकर आणि आमच्यामध्ये चर्चा करणे गरजेचे आहे तर आम्ही व्यक्तीगतरित्या स्वतंत्रपणे करु. वंचित बहुजन आघाडीच्या समोर 4 जागांचा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे. त्यांनी जी आम्हाला यादी दिली होती 27 जागांची त्यातल्या 4 जागा आहेत. आम्हाला भाजपाला पाडायचे आहे. आम्हाला हुकूमशाहीला पाडायचे आहे. हे प्रकाश आंबेडकरांना माहित आहे. त्या 4 जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचे आहे की, या 4 जागांसंदर्भात तुमची भूमिका काय आहे. याच्यामध्ये बोलवण्याचा, न बोलवण्याचा, मानसन्मानाचा काही प्रश्‍नच येत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.  

COMMENTS