Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध उत्पादकांचे प्रश्‍न त्वरित सोडवा  

युक्रांदची जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्याकडे मागणी

कर्जत : युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सोनोने यांना निवेदन देवून दुधाच्या प्रश्‍नावर चर्चा केली. शासन स्तरावर पा

तलाठ्याच्या वाहनाल ट्रँक्टरची धडक
कोतूळ संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवृत्ती पोखरकर
प्रवरेत स्टार्टअप प्रिझम फोरमची स्थापना  ः डॉ.शिवानंद हिरेमठ

कर्जत : युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सोनोने यांना निवेदन देवून दुधाच्या प्रश्‍नावर चर्चा केली. शासन स्तरावर पाठपुरावा करून हे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. दुध उत्पादकांसाठी तक्रार नंबर सुरू करण्याची मागणीही युक्रांदने केलेली मागणी मान्य केली.
गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे खरेदी दर पाडलेलेच आहेत. अनेक वेळा दुधाच्या विक्री दरात वाढ झालेली आहे पण खरेदी दरात वाढ केली जात नाही. मध्यंतरी शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर दुधाचे दर वाढवणार अशा घोषणा केल्या गेल्या. पण प्रत्यक्षात तसे दर मिळत नाहीत. 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफसाठी साधारण 25 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. मात्र दुध संघ आणि दुध संकलन केंद्रातून वेगवेगळा दर दिला जात आहे. शासनाच्या अभ्यासानुसार गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च साधारण प्रति लिटर 43 रुपये आहे. मात्र दुध उत्पादक शेतकर्‍यांना साधारण 25 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. ही शेतकर्‍यांची लूट आहे. 31 रुपये दर देण्याचा आदेश शासनाने काढला होता पण दुध संघ त्याप्रमाणे दर देत नाहीत. जे असे दर देणार नाहीत त्यांच्यावर करवाई करु असे आश्‍वासन दुग्ध विकास मंत्री यांनी दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. शासनाने दुधाचा जो उत्पादन खर्च काढला आहे किमान त्या दराने दुधाची खरेदी केली जावी. दुधाच्या अनुदानाची  किचकट प्रक्रिया आहे. त्या ऐवजी प्रत्यक्ष दुधाच्या दरातच वाढ करावी. मिल्को मीटर हे आधुनिक असावेत, यात छेडछाड करता येणार नाही एवढे पारदर्शक असावेत, ते वेळोवेळी प्रमाणित केलेल असावेत. कोणताही दुधसंघ कमी दर देत असेल किंवा इतर काही तक्रार असेल तर त्यासाठी तक्रार नंबर असावा जो प्रत्येक दुध संकलन केंद्रावर दर्शनी भागात लावणे सक्तीचे करावे. शासन आदेशा प्रमाणे दुधाचे दर न देणार्‍या दुध संघांवर करवाई करावी, अशा मागण्या युक्रांदच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यावेळी युवक क्रांती दलाचे राज्य संघटक अप्पा अनारसे, कर्जत तालुका कार्यवाह तथा उपसरपंच शिवाजी देशमुख,  सहकार्यवाह ड. शरद होले, जिल्हाध्यक्ष सुदाम लगड, ग्रामपंचायत सदस्य दिलीप खरात, मारुती अनारसे आदी उपस्थित होते.

COMMENTS