Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेतील 32 आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 32 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने

कामाचे मूल्यांकन करूनच मंत्रिपदे देणार : फडणवीस
बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा मृत्यू
केसीआरची ऑफर स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी नाकारली

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 32 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थपना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यामध्ये आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य सेविका पदावरून आरोग्य सहाय्यक (महिला) व आरोग्य सहाय्यक पदावरून आरोग्य पर्यवेक्षक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्या पदोन्नती प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आल्या आहेत इतर सर्व विभागांनी सुद्धा आपल्या विभागातील पदोन्नती प्रक्रिया ही तत्काळ पूर्ण करावी अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिल्या.

मागील महिन्यात आरोग्य कर्मचारी पदोन्नती संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रवींद्र परदेशी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी पदोन्नती प्रस्तावांची पडताळणी केली व दि. 9 रोजी आरोग्य सहाय्यक पदावरून आरोग्य पर्यवेक्षक पदावर 3, आरोग्य सेवक मधून आरोग्य सहाय्यक 23 तर आरोग्य सेविका पदावरून आरोग्य सहाय्यक (महिला) 6 अशा एकूण 32 कर्मचाऱ्यांना समुपदेशनातुन पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. समुपदेशानातुन पदोन्नती प्रक्रिया पार पडल्यामुळे पदोन्नती मिळालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.

COMMENTS