Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा थकबाकीचा आकडा सहाशे कोटींवर 

नाशिक  - घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. थकबाकीचा आकडा ६०७ कोटींवर पोहचला आहे. चालू वर्षातील करासह घरपट्टीची थक

रितेश-जेनेलियाच्या मुलांचे कौतुक
गरीब महिलांना ‘सरकारी साडी आवडीच्या रंगासाठी महिला लाभार्थ्यांचा हट्ट
’आरे’ तील आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; तनपुरे

नाशिक  – घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. थकबाकीचा आकडा ६०७ कोटींवर पोहचला आहे. चालू वर्षातील करासह घरपट्टीची थकबाकी ४८८ कोटी, तर पाणीपट्टीची थकबाकी हे ११९ कोटींवर पोहचली आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी पालिकेने धावपळ सुरू केली असून, कर विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला तीनशे घरांना भेटी देण्याचे लक्ष्य दिले न आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात २१  हजार बड्या थकबाकीदारांना नोटिसा के बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घरपट्टी वसुलीसाठी २०२३-२४या आर्थिक वर्षाकरिता अंदाजपत्रकात २१० कोटींची, तर पाणीपट्टी वसुलीसाठी

६५ कोटींचे उद्दिष्टे निश्चित केले होते. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी शासनाने महापालिकेवर महसुलीवृद्धीची अट घातल्यानंतर घरपट्टीच्या उद्दिष्टात वाढ करून २२५ कोटी, तर पाणीपट्टीसाठी ७५ कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. १ एप्रिल २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या दरम्यान १५५ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे. परंतु, थकबाकी वाढल्याने उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली करवसुली विभागाने युद्धपातळीवर वसुली मोहीम सुरू केली आहे.

घरपट्टी-पाणीपट्टीची विभागनिहाय थकबाकी

                (आकडे कोटीत)

विभाग           घरपट्टी।                   पाणीपट्टी

सातपूर           ४३.१२                    १८.६३

पंचवटी           १३३.८४                  २९.५५

नाशिक पश्चिम    ५१.०६                  ८.६२

नाशिक पूर्व        १०४.४०               २३.६७

नवीन नाशिक     ७१.२१                 १५.४८

नाशिकरोड         ८४.४३                 २३.६७

एकूण                ४८८.०८               ११९

COMMENTS