Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेशखिंड रस्त्यावर मालवाहू वाहनांना मनाई

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेत

नवाब मलिक बांगलादेशमधून मुली पुरवायचे? : मोहित कंबोज | LOKNews24
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खाजगी सावकाराविरोधात चौथा गुन्हा दाखल
गर्दी होण्याचा दोष अजित पवारांचा नाहीः चंद्रकांतदादा

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता मालवाहू जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. गणेशखिंड रस्त्यावरून अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, पोलिस वाहने, महापालिकेची वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच मेट्रोच्या कामासाठीच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
या रस्त्यावरून ये-जा करण्यास जड मालवाहू वाहनांना मनाई करण्यात आली आहे. दिवसा तसेच रात्रीही मालवाहू वाहनांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. सोलापूर रस्ता, हडपसर, पुणे शहरातून मुंबईकडे जाणारी जड वाहने, मालवाहू वाहने, भाजीपाला वाहतूक करणार्‍या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. मुंबईकडे जाणार्‍या मालवाहू वाहनांनी हडपसर, सासवड रस्ता, मंतरवाडी फाटा, कात्रज-कोंढवा रस्ता, कात्रजमार्गे मुंबईकडे जावे. नगर रस्त्याने मुंबईकडे जाणार्‍या वाहनांनी नगर रस्ता, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, पोल्ट्री फार्म चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने इच्छितस्थळी जावे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (आचार्य आनंदऋषीजी चौक) परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या भागातील वाहतूक बदलांविषयी गणेशखिंड रस्त्यावरील शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखा पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले.

COMMENTS