Homeताज्या बातम्यासंपादकीय

फायद्याचे ठरवून केलेलें बंड ! 

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाडलेल्या फुटीनंतर महादू होत असलेल्या राजकारणात पवार विरुद्ध पवार असं वास्तव नाही! अजित पवार यांनी त्या

सीएए कायदा : हिंदूंनाही जाचक !
पक्षांच्या समर्थन-विरोधात जनता नाही ! 
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना !

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाडलेल्या फुटीनंतर महादू होत असलेल्या राजकारणात पवार विरुद्ध पवार असं वास्तव नाही! अजित पवार यांनी त्यांच्या पक्षफोडीला शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याचे म्हटले तर, शरद पवारांनी आपला आशीर्वाद नसल्याचे म्हटले आहे.‌ पक्षफुटीचा हा सगळा प्रकार ठरवून केला गेला आहे काय? अशी शंका महाराष्ट्रात सातत्याने घेतली जात आहे. त्यात कितपत तथ्य आहे, असा विचार केला तर काही वस्तुनिष्ठ निकष आपल्याला लक्षात घ्यावे लागतात.‌ पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट आरोप लावला. मध्यप्रदेशातील भोपाल येथे एका जाहीर भाषणांतून राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार ७० हजार कोटीचा असल्याचा उल्लेख केला होता.‌  या सभेत त्यांनी हा उल्लेख केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडते. राष्ट्रवादीच्या न‌ऊ जणांना थेट मंत्री बनवले गेले. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या शपथविधी नंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले.‌ त्यांच्या या वक्तव्यात दूरदृष्टी सामावलेली आहे.‌ ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला त्याच नेत्यांना मंत्रीपदे दिली गेली.‌ ही बाब सध्या फार महत्वपूर्ण. मोदी ज्यांना भ्रष्ट म्हणतात त्यांना सत्तेत सामावून घेण्यात मात्र त्यांना धन्यता जाणवते, असा अप्रत्यक्ष सूर शरद पवार यांनी लावला आहे. यातील पहिले सूत्र एक स्पष्ट होते की, अजित पवारांच्या पक्षफोडीतून शरद पवार यांना होणारा हा पहिला फायदा.‌ महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती या पक्षाचा एक झंझावात आला. या नव्या पक्षाकडे महाराष्ट्र आकर्षिला जात असल्याने अनेक प्रस्थापित पक्षांना घाम फोडला. या नव्या वादळाला राजकीयदृष्ट्या रोखणे, हे शक्य कोटीतील वाटत नव्हते. त्यामुळे, एक धक्कादायक कृती आवश्यक होती.‌ शरद पवार यांनी परवा कराडच्या संगमभूमीतू महाराष्ट्राच्या जनमैदानात जी उडी घेतली त्याचा सर्वात मोठा परिणाम जर काही झाला असेल तर पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात मोठा वाव निर्माण झाला. त्यांच्या या कृतीतच आणखी एक महत्वपूर्ण बाब सामील आहे; ती बाब म्हणजे अखंड शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी खिंडार पाडल्यानंतर उभी राहिलेली न्यायालयीन लढाई, निवडणूक आयोगातील संघर्ष यातून सत्ताधाऱ्यांनी अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे यांच्या बाजूने झुकणारी मदत केली, असा आरोप होता. त्यातून उध्दव ठाकरे यांना पक्ष, चिन्ह आणि आमदार गमवावे लागले. त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगामुळे महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूती उध्दव ठाकरे यांच्या बाजूने गेली.  या तीन बाबी म्हणजे ईडी चे संकट असलेले नेते यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांना सत्तेत सामावून घेतले जाते, नरेंद्र मोदी यांच्यावर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात त्यांनाच सोबत घेतात, असा आरोप करून २०२४ च्या निवडणुकीतील त्यांच्या नैतिकतेवर आजच प्रश्नचिन्ह उभे करून त्यांना कोंडीत पकडण्याची पार्श्वभूमी तयार केली.‌ बीआर‌एस ची महाराष्ट्रात होणाऱ्या घोडदौडीला शरद पवार  मैदानात आल्यामुळे ब्रेक लागला. उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या जनतेतून जी राजकीय सहानुभूती मिळते आहे त्यात आता शरद पवार वाटेकरी झाले आहेत. या सर्व तपशीलाला पाहता अजित पवार यांनी केलेले बंड शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे दिसत असल्याने, अजित पवार यांच्या पक्षफोडीला शरद पवार यांचा आशीर्वाद असावा अशी रास्त शंका जनतेला येत आहे!

COMMENTS