Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठात प्रा. राम ताकवले यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिग्रंथाचे प्रकाशन

प्रा. राम ताकवले हे भविष्यवेधी विचारवंत होते - श्री. विवेक सावंत

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. राम ताकवले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाश

राज्यभर पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम ..!
जी-20 परिषदेसाठी राजधानीत 3 दिवस लॉकडाऊन
Ahmednagar मध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा… ‘या’ हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना | Sex Racket (Video)

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. राम ताकवले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन व व्याख्यान  मुक्त विद्यापीठाच्या प्रा. राम ताकवले संशोधन केंद्रामार्फत विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीच्या शैक्षणिक सभागृहात आयोजीत करण्यात आले होते. 

सदर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन श्री. विवेक सावंत मुख्य मार्गदर्शक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) पुणे यांच्या हस्ते, तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा संचालक डॉ. जयदीप निकम, कुलसचिव श्री. दिलीप भरड, इमरटस प्रोफेसर कविता साळुंके, प्रा. विजयकुमार पाईकराव उपस्थित होते. या स्मृतिग्रंथात प्रा. ताकवले सरांसोबत काम केलेले विविध मान्यवर, तिनही विद्यापीठातील त्यांच्यासोबत काम केलेले सहकारी यांच्या प्रा. ताकवले सरांसोबतच्या आठवणी नमूद करण्यात आलेल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रा. राम ताकवले यांचे एक शिक्षक म्हणून एकवटलेले विविध गुण या ग्रंथात मांडण्यात आलेले आहे.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम ताकवले संशोधन केंद्राच्या संचालक इमरटस प्रोफेसर कविता साळुंके यांनी केले.  आपले विचार व्यक्त करतांना श्री. विवेक सावंत यांनी सांगितले की,मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमी सांगायचो की, ताकवले सरांसोबत काम करतांना तुम्हचे विचार 10 वर्ष पुढे आहे असा विचार करून काम करा. ताकवले सर हे भविष्यवेधी विचारवंत होते. त्यांच्या विचारात स्पष्टता असायची. शिक्षण हे भविष्य निर्माण करण्यासाठी आहे, असे ते नेहमी म्हणायचे. ताकवले सरांचे वैशिष्टये म्हणजे त्यांनी शिक्षण, कृषी,  उद्योग, विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात काम करण्याची त्यांनी संधी मिळाली. 

विद्यार्थी विकास हेच त्यांचे मुळधोरण होते. त्यातूनच समाजाचा आणि देशाचा विकास होईल असे त्यांच मत होते. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला बंदिस्त शिक्षणापासून मोकळ करून मुक्त शिक्षण देण्याची आवश्यकता आहे आणि त्यातूनच त्यांनी नंतर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण तळागाळात नेण्याची संकल्पना पुढे नेली.  याप्रसंगी त्यांनी ताकवले सरांसोबत काम करतांना त्यांच्या विविध आठवणी उपस्थीतांना सांगितल्या. विद्यापीठाच्या संस्थापक कुलगुरूंनी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी अविरत प्रयत्न केले, अशा आपल्या पुर्वसुरींविषयी  कृतज्ञता कशी व्यक्त करावी त्याचा वस्तुपाठ कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी उभा केला, याबद्दल त्यांनी कुलगुरू आणि मुक्त विद्यापीठाचे कौतुक केले आणि आभार देखील मानले. 

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, त्यांना प्रत्येक वेळी भेटल्यावर त्यांचेकडे नविन विचार असायचे. ते काळाच्या पुढे चालणारे व्यक्तीमत्व होते. त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे माझ्या व्यक्तीमत्वात बदल झाला असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी ताकवले सरांच्या विविध आठवणी उपस्थीतांना सांगितल्या. ताकवले सरांचे विचार जाणून घेणे, त्याप्रमाणे कार्यप्रवण होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असे शेवटी त्यांनी सांगितले. प्रमुख पाहूण्यांचा परिचय डॉ. विद्यादेवी बागुल यांनी करुन दिला. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सचिन पोरे  यांनी केले, तर आभार प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी मानले कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक  उपस्थित होते.

COMMENTS