राहाता/प्रतिनिधी ः श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी द्वारा संचलित श्री साईबाबा महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. सोनाली रामदा
राहाता/प्रतिनिधी ः श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी द्वारा संचलित श्री साईबाबा महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. सोनाली रामदास हरदास-जेजुरकर यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी बहाल झाली आहे. प्रा. सोनाली हरदास जेजुरकर यांनी हिंदीतील सुविख्यात कवि मनोज सोनकर यांच्या मनोज सोनकर की काव्यभाषा : एक अनुशीलन या विषयावर आपला शोध प्रबंध सादर केला होता. आपले शोधकार्य त्यांनी अहमदनगर येथील न्यु. आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर येथील डॉ. अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले. प्रा. सोनाली या अस्तगाव येथील भिमराज वामन जेजुरकर यांच्या स्नुषा तर बेलापूर येथील रामदास तुकाराम हरदास यांच्या कन्या आहेत. तर किरण भीमराज जेजुरकर यांच्या पत्नी आहेत. या संशोधन कार्यात त्यांना श्री साईबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे, राजेंद्र कोते, दिनेश कानडे, विश्व हिंदी सहित्य परिषद उ. प्र. चवे अध्यक्ष डॉ. शहाबुद्दीन शेख, न्यु. आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. हनुमंत जगताप, ग्रंथपाल नुतन शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
COMMENTS