Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. प्रा. राम शिंदे सभापतीपदी बिनविरोध

नागपूर : विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी गुरूवारी निवडणूक होणार होती. मात्र सभापतीपदासाठी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त

ज्ञानेश्‍वर देशमुख यांच्याकडून नवे देडगाव शाळेला पुस्तके भेट
नगर अर्बन सस्पेन्स घोटाळ्यात गांधी बंधूंसह त्यांच्या चुलतीला वॉरंट
आ. लंकेंची लिपिकास मारहाण..पण त्याचे घुमजाव…

नागपूर : विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी गुरूवारी निवडणूक होणार होती. मात्र सभापतीपदासाठी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची गुरूवारी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सभागृहात या बाबतची घोषणा केली. नीलम गोर्‍हे यानी सभागृहात राम शिंदे यांचा परिचर करुन देत सभागृहाचे आणि राम शिंदे यांचे अभिनंदन केले. सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे, उमा खापरे, शिवाजीराव गर्गे यांनी सभागृहात मांडला. या प्रस्तावाला सदस्या मनीषा कायंदे, अमोल मीटकरी, ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. प्रा.राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसून पदभार सोपविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. अडीच वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी अखेर भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राम शिंदेंना क्लास कसा चालवायचा याची सवय : फडणवीस
प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. यापूर्वी देखील प्राध्यापक फरांदे हे एक सर होते. त्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला होता. रामराजे नाईक निंबाळकर देखील वकील आणि प्रोफेसर होते. राम शिंदे देखील त्याच पद्धतीने शिस्तीने आणि संवेदनशीलपणे सभागृह चालवतील, असा मला विश्‍वास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शब्दादी म्हणजेच महत्त्वाच्या वर्षी अहिल्यादेवी होळकर यांचे वडील मानकोजी शिंदे यांचे नवव्या पिढीतील वारसदार असलेले राम शिंदे याच्या सारखा व्यक्ती हा विधान परिषदेच्या सभापतीपदी बसतो आहे. हा एक प्रकारे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना या सभागृहाने वाहिलेली सुमनांजली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

COMMENTS