Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांची विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ सदस्य पदी निवड

मुखेड प्रतिनिधी - ग्रामीण ( कला,वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथील माजी प्राचार्य तथा हिंदी विभागात कार्यरत प्रा.डॉ. रामकृष्

पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच
आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन
बोगस बियाण्यांचा गोरखधंदा; 59 लाखांचे सोयाबीन बियाणे जप्त

मुखेड प्रतिनिधी – ग्रामीण ( कला,वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथील माजी प्राचार्य तथा हिंदी विभागात कार्यरत प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ सदस्य म्हणून मा.कुलगुरूंनी पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती दिल्याचे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव  यांचेकडून नुकतेच प्राप्त झाले आहे.आजीवन अध्ययन आणि विस्तार मंडळ हे विविध  पदवी स्तरावरील अध्ययनक्रम व कौशल्य विकास  अध्ययनक्रम या मधुन कौशल्यपूर्ण  व विद्वत्तापूर्ण मनुष्यबळ तयार करण्यासाठीचे कार्य करते.
प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांनी विद्यापीठाच्या स्थापनेपासून बहि:शाल व्याख्यानमालेचे सल्लागार व वक्ते, विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य म्हणून कार्य केले आहे. विद्यापीठाच्या विविध समित्यांवरती वेळोवेळी त्यांनी आपले योगदान दिले असून विद्यापीठाचे कुलगुरू प्रतिनिधी व विषयतज्ञ म्हणूनही त्यांनी उत्कृष्टपणे कार्य पार पाडले आहे.त्यांच्या पाठीशी मागील 31 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असून त्यांना 2020-21 वर्षीचा विद्यापीठातील उत्कृष्ट शिक्षक (ग्रामीण ) पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमधुनही त्यांनी  संशोधन पत्र वाचन केले आहे.त्यांच्या नावावर काही ग्रंथ असून संशोधनपर व अन्य प्रासंगिक विपुल लेखन त्यांनी केले आहे.विविध विषयांवर महाराष्ट्रभर ते व्याख्याने देत असतात.आईकार म्हणुन त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.या शिवाय अनेक पुरस्कारांनी त्यांना वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.या सर्व बाबींचा विचार करून विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ.उद्धव भोसले सरांनी अत्यंत महत्त्वाच्या या मंडळावरती सरांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.ज्यात विमुक्त जाती सेवा समितीचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव  राठोड,संस्थेचे सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड,मुखेड कंधार विधानसभा  परिक्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड,संस्थेचे  सहसचिव गोवर्धन पवार,सदस्य संतोष राठोड,सदस्य मुख्या.गोविंद पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड,उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे,स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ.नागोराव आवडे,सहस्टाफ सेक्रेटरी  प्रा.सौ.अरूणा ईटकापल्ले, कार्यालय अधिक्षक रमेश गोकुळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.गुरुनाथ कल्याण, माजी स्टाफसेक्रेटरी प्रा.डॉ.व्यंकट चव्हाण व सर्व सहकार्‍यांनी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS