Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या कथेची बी.ए. अभ्यासक्रमात निवड

श्रीरामपूर ः येथील शिरसगाव इंदिरानगर भागातील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांच्या कथेची सावित्

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने साई भक्तांना सुगंधी दूध वाटप
जिल्ह्यातील रुग्णांच्या वेदना मुक्तीसाठी आ.संग्राम जगताप यांचा पुढाकार
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान

श्रीरामपूर ः येथील शिरसगाव इंदिरानगर भागातील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांच्या कथेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत मराठी विषयाच्या प्रथम वर्ष कला शाखा अभ्यासक्रमात निवड करण्यात आली आहे.
  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे येथील सर परशुरामभाऊ स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विषयासाठी डॉ. उपाध्ये यांच्या’– आणि कमल सापडली’ या कथेचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या कथेत मुलेमुले पळवून नेणे आणि त्यामुळे कुटुंब, गाव यांच्या जीवनात कशी कुत्तरओढ होते, त्यातून सुटका प्रसंगाचे अत्यंत हृदयस्पर्शी कथानक गुंफलेले आहे. डॉ. उपाध्ये हे रयत शिक्षण संस्थेत1984 ते2017 या काळात मराठीचे प्राध्यापक होते. सातारा, पुणे, कर्जत, श्रीरामपूर या शाखेत त्यांनी अध्यापन केले. मराठी विभाग प्रमुख म्हणून ते रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले. डॉ. उपाध्ये यांची51 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या आणि डॉ.. संजीवनी वाघ, प्रा स्वप्नील जोशी यांनी अभ्यासक्रमासाठी संपादित केलेल्या’ भावलेल्या कथा’ ह्या पुस्तकात ही कथा समाविष्ट आहे. डॉ. उपाध्ये यांच्या’ माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ या कथासंग्रहातून ही कथा घेतली आहे. डॉ. उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली08 विद्यार्थी पीएच.डी. व17 विद्यार्था एम.फिल् झाले आहेत. ते बहिःशाल शिक्षण मंडळ अंतर्गत व्याख्याते आहेत. अभ्यासक्रमात कथा समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS