Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्पादन संस्था अन् रोजगार संबंध !

दोरान एकमग्लू आणि सायमन जॉन्सन याबरोबरच जेम्स रॉबिन्सन, अशा तिघांना मिळून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला होता. या तिघांमध्ये दोरा

दूध प्रश्‍नांवर कोतुळमध्ये आजपासून बेमुदत धरणे आंदोलन
राहुरी शहरात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; शिवप्रेमींचा संताप
सैनिकी विद्यालयात पदकं विजेत्या तायक्वांदो खेळाडूंचा मेडल्स, प्रमाणपत्र देऊन सन्मान

दोरान एकमग्लू आणि सायमन जॉन्सन याबरोबरच जेम्स रॉबिन्सन, अशा तिघांना मिळून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला होता. या तिघांमध्ये दोरान एकमग्लू आणि सायमन जॉन्सन या दोघांनी गेल्या हजार वर्षातील मानवी समाजाची प्रगती, ही नेमकी कशावर आधारलेली आहे, याचं विवेचन त्यांच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतांमधून केले आहे. त्यांच्या मते जेव्हा कोणतीही सत्ता ही आपली सत्ता टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करते, तेव्हा ती लोकांचे शोषण करायला लागते.

 लोकांचे शोषण करणारी सत्ता ही कोणत्याही प्रकारे विकासाच्या दिशेने जाऊ शकत नाही किंवा नव्या बदलांच्या दिशेने जाऊ शकत नाही; असा त्यांचा सिद्धांत. जगामध्ये भांडवलशाहीचे जे अधिराज्य दर दिवसाला मजबूत होत आहे, त्या भांडवलशाहीला काहीसा धक्काही देणार आणि काहीसं स्वागतही करणार आहे. असं हे संशोधन म्हणता येईल. धक्का देणारे यासाठी म्हणता येईल की, यांच्या संशोधनांमधून ते थेट म्हणतात की, कोणत्याही देशातील सत्ता जेव्हा अधिक काळ स्थिर होण्याचा प्रयत्न करते तेव्हा, आपसूकच ते तेथील जनतेचे शोषण ही करायला लागते. जनतेच्या शोषणातून कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. याउलट सत्तेने जनतेला रोजगार देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नेहमीच वापर करावा. जो यापूर्वी जगभरातील देशांवर राज्य केलेल्या मध्ययुगीन ब्रिटिश सत्तेने, शेती तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणात वाव दिला. परिणामी जगभरातील देशांमध्ये – ज्या ज्या देशांमध्ये त्यांची सत्ता राहिली – त्या ठिकाणी आर्थिक विकास होण्यालाही मदत झाली. आजचा काळ तर हा अधिक तंत्रज्ञानाचा आणि आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा असल्यामुळे, या काळामध्ये निर्मिती आणि रोजगाराच्या संधी अधिक निर्माण करता येतील. परंतु, त्यासाठी कोणत्याही राज्य सत्तेने तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योग किंवा राज्यव्यवस्था चालविण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तंत्रज्ञानाला नजरेआड करून कोणतीही सत्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असेल, तर, निश्चितपणे ते आपल्या देशाला गरिबीच्या बाहेर आणू शकत नाही. तंत्रज्ञान हे वर्ष गणिकच नव्हे तर, प्रत्येक काळात ते बदलत राहते. त्यामुळे, त्या नव्या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय कोणत्याही देशाला आपल्या देशाची उत्पादन संस्था आणि औद्योगिक संस्था निर्माण करण्यास आणि वाढविण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. औद्योगिक संस्कृती निर्माण झाल्याशिवाय कोणत्याही देशाला रोजगाराचा पुरवठा करता येत नाही. रोजगाराचा पुरवठा न झालेल्या देशांची आर्थिक अधोगती ही गरिबीकडेच होते; हे मात्र निश्चित. त्यामुळे या अर्थतज्ज्ञांनी नव्या तंत्रज्ञानाचे गोडवे गात असतानाच, परंपरागत राजकीय सत्ता, ज्या अधिक काळ स्थिर होण्याचा प्रयत्न करतात, त्यांना एक सूचित ही करतात की, सत्तेला जितके तुम्ही जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न कराल, तितके जास्तीत जास्त प्रश्न उभे राहतील! त्या ऐवजी सत्ता लोकशाही पद्धतीने राबवून, ती येणारी आणि जाणारी अशी ठेवली तर, निश्चितपणे त्यातून कोणत्याही देशाला अधिक काही मिळू शकते. खरे तर आपण दरवर्षी  चर्चा करतो; परंतु, ही चर्चा जेवढी गंभीर असते, तितकेच, जगातील त्या त्या क्षेत्रातील व्यवस्था कशा अंगाने पुढे जाईल, याचे एक प्रकारे जगाला मार्गदर्शनच असते. त्यामुळे याचे  महत्त्वही अनन्यसाधरण असते.

COMMENTS