Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रियांका चोप्राची बहीण अडकली लग्नबंधनात

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा हिचा आज तिचा दीर्घकाळचा प्रियकर रक्षित केजरीवाल याच्याशी विवाह झाला. अभिनेत्रीने जयपूरमध्ये मोठ्या दणक्या

अन्न पदार्थांत भेसळ आढळल्यास ‘FSSAI’ कडे तक्रारी करा ! – मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त
शाहरुख खानने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांची महिलांची घेतली भेट
गुहा धार्मिक तणावानंतर परस्पराविरोधात गुन्हे दाखल

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा हिचा आज तिचा दीर्घकाळचा प्रियकर रक्षित केजरीवाल याच्याशी विवाह झाला. अभिनेत्रीने जयपूरमध्ये मोठ्या दणक्यात लग्न केले. तिने तिच्या लग्नाचे फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये वधू मीरा चोप्रा लाल रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होत आहे. लग्नाच्या फंक्शनसाठी मीराने लाल रंगाचा सब्यसाची लेहेंगा घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती तर रक्षित पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत होता. मीरा ने फोटो शेअर करत लिहिलं आहे. आता नेहमीसाठी आनंद , भांडण, हास्य, अश्रू, आणि आयुष्यभराच्या साथ . तिच्या या पोस्टवर मित्रपक्ष आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मीराचे लग्न जयपूर-दिल्ली हायवेवरील बुएना विस्टा लक्झरी गार्डन स्पा रिसॉर्टमध्ये  पार पडले. 11मार्च रोजी मेहंदी, हळदी, आणि संगीत सोहळा पार पडला. मीराचे जवळचे मित्र या लग्नाला सहभागी झाले होते. मीरा चोप्रा ही अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. मात्र, त्यांच्या लग्नात एकही सेलिब्रिटी दिसला नाही.  मीरा चोप्रा बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडस्ट्रीत जास्त सक्रिय आहे. ‘शिवांगी’, ‘टीना चोप्रा’ आणि ‘अंजली दंगळे’ या चित्रपटांशिवाय मीराने ‘संध्या रेड्डी’, ‘मीरा’, ‘नीला’, ‘अज्ञात’, ‘प्रिया’ यांसारख्या अनेक तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

COMMENTS