बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजेप्रि यांका चोप्रा. प्रियांका चोप्रा तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारत
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजेप्रि यांका चोप्रा. प्रियांका चोप्रा तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात आली आहे. प्रियांका तिच्या भारत दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. प्रियांका तिच्या हेअर प्रोडक्ट अनोमलीच्या प्रमोशनसाठी मुंबईत आली आहे. उत्तर प्रदेशातील मुलींवरील हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रियांका चोप्रा दोन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहे. गोमतीनगर येथील संतमूलक चौकाजवळ अभिनेत्रीच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टवर लिहिलंय ‘यू आर नॉट वेलकम सिटी ऑफ नवाब’. असे पोस्टर्स कोणी लावली याचा तपास गोमतीनगर पोलिस करत आहेत. अद्याप कोणाचे नाव समोर आले नाही.

COMMENTS