Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रियदर्शनी मुंडे, पृथ्वीराज मुंडेचे अबॅकस आंतरराष्ट्रीय परिक्षेत यश

बीड प्रतिनिधी - येथील प्रियदर्शनी महादेव मुंडे व पृथ्वीराज महादेव मुंडे यांनी अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या परिक्षेत यश संपादन केले आह

रेल्वेपूल कोसळून 17 कामगारांचा मृत्यू
मलिकांच्या समर्थनार्थ आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन
ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचे निधन

बीड प्रतिनिधी – येथील प्रियदर्शनी महादेव मुंडे व पृथ्वीराज महादेव मुंडे यांनी अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या परिक्षेत यश संपादन केले आहे. याबद्दल त्यांचा नुकताच प्रमाणपत्र व ट्रॉफ ी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अबॅकस क्लासचे संचालक डॉ.एस.ए.घोडके सर, महादेव मुंडे व सौ.संगीता मुंडे, पत्रकार उदय नागरगोजे यांची उपस्थिती होती.अबॅकस आणि वैदिक नातं गणितीय तंत्रामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास होतो आहे असे प्रियदर्शनी आणि पृथ्वीराज मुंडे पालक श्रीमान महादेव मुंडे यांनी व्यक्त केले आहे.   आंतरराष्ट्रीय स्तरावरील अबॅकस असोसिएशनच्या  जानेवारी 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित केलेल्या होत्या. यामध्ये प्रियदर्शनी महादेव मुंडे यांनी सर्वोत्कृष्ट बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड मिळवून यश संपादन केलेले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल  ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप आणि आंतरराष्ट्रीय रेस अबॅकस असोसिएशन यांच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेच्या 19 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे पृथ्वीराज महादेव मुंडेने सर्वोत्कृष्ट मानद उडन सायटेशन आणि ट्रॉफी  मिळवली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांपैकी पहिल्या लेवलच्या जुनियर स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावर त्याची निवड झालेली आहे. अबॅकसमुळे विद्यार्थ्यांचा गणितामधील आवड निर्माण होऊन गणिताबद्दलची मनात असलेली भीती कमी होते. अनेक क्लिष्ट अशी गणिते सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्मरणशक्ती यांचा विकास करण्यासाठी अबॅकसचा उपयोग होत असल्याचे महादेव मुंडे  यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS