‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य : छगन भुजबळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य : छगन भुजबळ

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिक कनेक्ट करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्य

Murbad : मुरबाडच्या जगन विशे गाडी चालकाचा प्रामाणिकपणा (Video)
शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू : पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांशी साधणार संवाद

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिक कनेक्ट करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच येथील नाविन्यपूर्ण अध्यासन केंद्रांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी प्राधान्य असेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे तर मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, प्राचार्य विश्वास गायकवाड, डॉ. विजय सोनवणे, डॉ.राजेश पांडे, डॉ.प्रफुल्ल गायकवाड, डॉ. अमित पाटील, डॉ.नंदू पवार, डॉ.तान्हाजी पवार, डॉ. मोतीराम देशमुख, सरपंच सुनीता निंबाळकर, माजी सरपंच पांडुरंग गडकरी यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक उपकेंद्राची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी आणि नाशिकमध्ये या विद्यापीठाचे स्वतंत्र्य कॅम्पस उभारण्यासाठी कित्येक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील होतो. विद्यापीठाचे काम इतके वाढले आहे की, त्याचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न केले. त्यातून आज हे उपकेंद्र उभे राहत आहे याचा आनंद आहे. नाशिक मध्ये अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. मुंबई पुण्यानंतर नाशिकची शैक्षणिक वाटचाल अत्यंत वेगाने सुरु असून देशभरातील तसेच विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिकला येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आगामी काळातील नाशिकचा शैक्षणिक विस्तार व शिक्षणाच्या रुंदावलेल्या कक्षा लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे सक्षमीकरण करून येथे विद्यापीठाचा ”नाशिक कॅम्पस” सुरु करण्याचा शासनाने दि.२४ जुन २०१३ रोजी निर्णय घेतलेला होता. साधारण सन २०१२-१३ साली आम्ही हे कॅम्पस सुरु व्हावे यासाठी सातत्याने बैठका घेत होतो विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यावेळी उच्च-शिक्षण मंत्री होते. २०१४ साली या उपकेंद्रासाठी मौजे शिवनई येथील ६२ एकर जागा निश्चित करण्यात आली होती. पण नंतरच्या पाच वर्षात या उपकेंद्राचे काम रखडले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही या कामाला गती दिली आणि आज अखेर कॅम्पसचा भुमिपुजन सोहळा पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सुरुवातीला जमीन हस्तांतरणासाठी यात अनेक अडचणी आल्या होत्या काही शेतकऱ्यांचा विरोध होता, पण आम्ही त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि ही जमीन विद्यापीठाला देण्यात आली. मी या माध्यमातुन त्या सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी शैक्षणिक कार्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली. मात्र मी त्या सर्व गावकऱ्यांना आश्वसत: करतो की तुम्हाला या भागात लागणाऱ्या रस्ते, वीज, पाणी इ. सर्व पायाभुत सुविधा आम्ही निश्चितपणे प्राधान्याने उभ्या करु असे आश्वासन त्यांनी उपस्थित गावकऱ्यांना दिले. ते म्हणाले की, नाशिकमध्ये एज्युकेशन हब निर्माण व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी नाशिक मध्ये होत असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अतिशय महत्वाचे ठरणार आहे. युजीसी व एआयसीटीईच्या माध्यमातून विविध शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करून मोफत शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच शहराची वाढती शैक्षणिक गरज लक्षात घेऊन केंद्रीय विद्यालयांची निर्मिती. तसेच केंद्र शासनाच्या व्यवसायाभिमुख केंद्रीय महाविद्यालयांची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे आधुनिकीकरण करून येथे तज्ज्ञ शिक्षक, ऑडीओ व्हिज्युअल वर्ग, सुसज्ज वाचनालये निर्माण करण्यात येऊन ‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

COMMENTS