Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा

पुणे प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत तिसर्‍या क्रमाकांवर येईल
नरेंद्र मोदी आज तिसर्‍यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ
रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

पुणे प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. याचवेळी रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कोलकता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सहभागी झाले होते.

पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग ५.५ किलोमीटरचा असून ५ फेब्रुवारीला या मार्गावर मेट्रोची चाचणी झाली होती. यापूर्वी ६ मार्च २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या ७ किलोमीटर आणि वनाज ते गरवारे ५ किलोमीटर मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय ६.९१ किलोमीटर आणि गरवारे ते रुबी हॉल ४.७५ किलोमीटर अशा विस्तारित मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते.

COMMENTS