नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातील पानिपत येथून विमा सखी योजनेचा शुभारंभ केला. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या योजनेचा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातील पानिपत येथून विमा सखी योजनेचा शुभारंभ केला. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सातत्याने पावले उचलत आहे. आजचा दिवस इतर कारणांनी खास असून आज 9 तारीख आहे. शास्त्रांमध्ये 9 हा अंक अत्यंत शुभ मानला असून त्याचा संबंध शक्तीशी आहे. या योजनेमुळे महिला सक्षम होतील आणि त्या आर्थिक भागीदार बनतील, असे ते म्हणाले. महिलांच्या नावाने आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.
विमा सखी म्हणून काम करणार्या महिलांना मानधन देण्यात येणार आहे. अवघ्या तीन वर्षात एलआयसी महिलांना तब्बल 2 लाख 16 हजार रूपयांचे मानधन देणार आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने विमा सखी योजना जाहीर केली आहे. विमा सखी योजनेमुळे महिलांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. एलआयसीकडून विमा सखी योजना राबवण्यात येणार आहे. 3 वर्षात एलआयसीकडून 2 लाख 16 हजार रूपयांचे मानधन विमा सखींना देण्यात येणार आहे. विमा सखी योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांत 2 लाख महिलांना स्वालंबी बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेसाठी महिलांचे शिक्षण 10 वी पूर्ण आणि किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी असणार आहे तर योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7 हजार रूपये दिले जाणार आहे. एलआयसीच्या विमा सखी योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्षे वयोगटातील किमान 10 वी उत्तीर्ण महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. या महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिल्या तीन वर्षांसाठी निश्चित मानधनही मिळणार आहे. समाजात आर्थिक शिक्षणाला चालना मिळावी आणि लोकांना विम्याबाबत जागरुक व्हावे यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. विमा सखी सोसायटीत एलआयसी एजंट म्हणून काम करणार आहेत. एवढेच नव्हे तर पदवी धारण केलेल्या विमा सखींना भविष्यात एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधीही मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विमा सखींना प्रतीकात्मकरित्या नियुक्तीपत्रही सुपूर्द केले आहे. या योजनेअंतर्गत विमा सखींना पहिल्या तीन वर्षांसाठी 5 ते 7 हजार रुपये मानधन मिळणार आहे. यानंतर ती विमा सखी म्हणून काम करेल आणि तिला प्रत्येक पॉलिसीवर कमिशन दिले जाईल. एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येतील. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत एलआयसीमध्ये आधीच कार्यरत असलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार नाही.
COMMENTS