Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सफायर बिजनेस एक्स्पो नगर जिल्ह्याची शान : दुर्गाताई तांबे

संगमनेर : लायन्स संगमनेर सॅफ्रॉन सफायर आयोजित सफायर बिझनेस एक्स्पो नगर जिल्ह्याची शान असून ३-४ तालुक्यातील नागरिकांना संगमनेरमध्ये खरेदी, मनोरंजन

समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)
अजय फटांगरे यांनी कर्तृत्व आणि नेतृत्वातून नावलौकिक मिळवला : ना. थोरात
बसस्थानकात एसटीच्या चालकाकडून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
a36bf4da-60b0-47bc-bf5a-7c21e06e6a5c.jpg

संगमनेर : लायन्स संगमनेर सॅफ्रॉन सफायर आयोजित सफायर बिझनेस एक्स्पो नगर जिल्ह्याची शान असून ३-४ तालुक्यातील नागरिकांना संगमनेरमध्ये खरेदी, मनोरंजन आणि मेजवानीची संधी मिळत असते असे प्रतिपादन संगमनेर नगरपालिकेच्या मा. नगराध्यक्षा आणि एक्स्पोच्या उद्घाटक दुर्गाताई तांबे यांनी केले. गुरूवार दि. १५ जानेवारी रोजी मालपाणी लॉन्स येथे हा उदघाटन सोहळा पार पडला. उद्योजक गिरीश मालपाणी यांनी १८ वर्षांपूर्वी लायन्स क्लबची स्थापना केली आणि गेल्या त्यांच्या संकल्पननेतून १७ वर्षांपासून बिझनेस एक्स्पो संगमनेरमध्ये होतो आहे याचा विशेष आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ चे ग्लोबल ऍक्शन टीमचे प्रमुख राजेंद गोयल, डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ चे कॅबिनेट ऑफिसर ला. शरद पवार, संस्थापक अध्यक्ष एमजेएफ गिरीश मालपाणी, झोन चेअरपर्सन प्रशांत रूणवाल, १७ वर्षांपासून या प्रकल्पाची धुरा सांभाळणारे मा. अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिंवसरा आदी मान्यवर उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्षा आणि प्रक्लप प्रमुख स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा हेही यावेळी मंचावर उपस्थित होते.

गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. अध्यक्ष स्वाती मालपाणी यांनी लायन्स संगमनेर सॅफ्रॉन सफायर राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. झोन चेअरपर्सन प्रशांत रूणवाल यांनी बिझनेस एक्स्पो प्रकल्पाचे कौतुक करताना तयार होणारी धनराशी ही क्लबची रिकरींग ऍसेट असल्याचे सांगितले. यशस्वीततेमागे सतत नाविण्यता आणि कष्ट केल्यानेच हे यश मिळाल्याचे रूणवाल यांनी सांगितले. संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी यांनी या प्रकल्पामुळे उद्योजकांना प्लॅटफॉर्म मिळत असल्याचे म्हटले. फन, फुड आणि शॉप यापुरताच हा एक्स्पो राहिला नसून एज्युकेशन ही नवीन संकल्पना आम्ही वाढविल्याचे त्यांनी सांगितले. बी.बी.ए. च्या विद्यार्थ्यांना यातून व्यावसायाच्या अनेक गोष्टी शिकायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले. हा प्रकल्प वर्षातून दोनदा होणार असल्याची घोषणाही गिरीश मालपाणी यांनी केली.

प्रमुख अतिथी ला. राजेंद्र गोयल यांनी संगमनेर सफायरच्या प्रकल्पाचे कौतुक करताना सांगितले की इतर कोणत्याही संस्थेला हा प्रोजेक्ट अनुकरणीय असून त्याचा पाया गिरीश मालपाणी यांनी घातला याचा विशेष अभिमान आहे. प्रोजेक्ट चेअरमन श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिंवसरा यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.  यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेक्रेटरी प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले  आभार सुदीप हासे यानी मानले.

२२ जानेवारीपर्यंत या एक्स्पोचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन लायन्स सफायरचे प्रकल्प प्रमुख एम. जे. एफ गिरीष मालपाणी, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिंवसरा त्यांच्या टीमने केला आहे.  यावेळी संगमनेरमधील विविध उद्योजक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.

मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना बिझनेस प्रॅक्टिकली शिकण्याची सुवर्णसंधी – गिरीश मालपाणी

खरेदीसाठी, खाण्यासाठी आणि विविध खेळांसाठी संगमनेरकर या एक्स्पोचा आनंद घेणारच आहेत मात्र विद्यार्थी या प्रकल्पातून ९ पी शिकणार आहेत. ते पी म्हणजे प्रोडक्ट, प्लॅटफॉर्म, प्लेस, प्रोपोझिशन, प्रमोशन, पीपल, प्रोसेस, पोर्टफोलिओ आणि प्रोजेक्ट. त्यामुळे यावेळी फुड, फन आणि शॉप बरोबरच एज्युकेशन मुद्दा वाढविल्याचे गिरीश मालपाणी यांनी सांगितले.

COMMENTS