Homeताज्या बातम्यादेश

राष्ट्रपती मुर्मू यांना तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली ः तिमोर लेस्ते या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणार्‍या ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना

कृषी कायद्यावर स्थगिती असतांना आंदोलन कशासाठी ? : सर्वोच्च न्यायालय | DAINIK LOKMNTHAN
सहकाराचे ग्रहण थांबवावेच लागेल!
कोतुळ शिक्षण संस्थेचे आज मंत्री आठवलेंच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली ः तिमोर लेस्ते या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणार्‍या ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान व्यक्त केला आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानाने भारत आणि तिमोर लेस्ते या देशांमधील खोलवर रुजलेले बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर अधोरेखित होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की राष्ट्रपतीजी यांचा तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने गौरव होत असताना पाहणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यातून आपल्या देशांमधील मजबूत बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर प्रतिबिंबित होत आहे. अनेक वर्षांपासून जनसेवेतल्या त्यांच्या संस्मरणीय योगदानाचाही हा सन्मान आहे.

COMMENTS