Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आटपाडी तालुक्यातील समन्यायी पाणी वाटपाचे सादरीकरण

मुंबई / पाटण : प्रत्येक शेतकर्‍याला दरडोई शेती साठी 1000 घन मिटर पाणी मिळाले तर शेतकरी समृध्द होऊन त्याची उन्नती होईल, अशी संकल्पना श्रमिक मुक्ती

नांद्रे येथे माजी सैनिकाचा विळ्याने गळा चिरून खून
व्यापार्‍याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई
राजारामबापू कारखाना निवडणूक बिनविरोध; संचालक मंडळात 14 नवे चेहरे

मुंबई / पाटण : प्रत्येक शेतकर्‍याला दरडोई शेती साठी 1000 घन मिटर पाणी मिळाले तर शेतकरी समृध्द होऊन त्याची उन्नती होईल, अशी संकल्पना श्रमिक मुक्ती दलाने मांडली होती. त्याचे प्रात्यक्षिक म्हणून शासनाने आटपाटी तालुका मॉडेल म्हणून करायचे ठरवले होते. ते योग्य रीतीने होत आहे हे सिध्द झाले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात समन्यायी पाणी वाटप धोरण राबवून लोकांचे राहणीमान, रोजगार, शेतीचे प्रश्‍न सुटू शकतात. अशा विश्‍वासातून यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्ठमंडळाने खा. शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे आणि श्रमिक मुक्ती दल यांच्या संयुक्त प्रयत्नातून समन्यायी पाणी वाटप पथदर्शक प्रकल्पाचे सादरीकरण डॉ. भारत पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समोर मांडले. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रजपूत, मुख्य अभियंता धुमाळ यांची उपस्थिती होती.
लवकरात लवकर ही योजना सर्व तालुक्यात शासनाने राबवावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली. त्यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संपत देसाई, युवा नेते चैतन्य दळवी, संतोष गोठल, डि. के. बोडके, सचिन कदम, महेश शेलार, तानाजी बेबले उपस्थित होते.
समन्यायी पाणी वाटपाच्या बैठकीनंतर खपवळर र्ीपीहरलज्ञश्रशव हे डॉ. भारत पाटणकर आणि जॉयचे लेख असणारे, नव्या दृष्टिकोनाचे पुस्तक खा. शरद पवार यांना भेट देण्यात आले.

COMMENTS