प्रांताधिकारी प्रसाद मते यांची माहिती पाथर्डी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दक्षिण 37 लोकसभा मतदार संघातील शेवगाव पाथर्डी विधानसभ
प्रांताधिकारी प्रसाद मते यांची माहिती
पाथर्डी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दक्षिण 37 लोकसभा मतदार संघातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाथर्डी शेवगाव उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी दिली. शेवगाव विधानसभा मतदार संघात सन 2019 चे विधानसभा निवडणूकीमध्ये 361 मतदान केंद्र होती. या मतदान केंद्राची मागील सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये पाहणी करुन आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.यादी भागामधील दिड हजार पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्राचे विभाजन करून असे चार नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहे.त्यामुळे शेवगाव विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 365 मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत.बदल करण्यात आलेल्या मतदान केंद्राच्या इमारती व वाढीव मतदान केंद्राची यादीस राज्य निवडणूक आयोग यांनी माहे जानेवारी मध्ये संमती दिलेली आहे. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांना याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे. शेवगाव मतदार संघात 34 क्षेत्रिय अधिकारी यांची नेमणूका करण्यात आल्या आहेत.क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फत मतदान केंद्राची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली असुन सर्व मतदान केंद्राची सुस्थितीत असलेबाबत अहवाल घेण्यात आलेला आहे. मतदान केंद्रामधील आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करणेबाबत संबंधीत यंत्रणाना कळविण्यात आलेले असून क्षेत्रीय अधिकार्यांना ईव्हीएम ची माहिती व सूचना देण्यात आले आहे.फ्लाईंग स्कॉड,स्टॅटिक सर्व्हिलन्स,व्हिडिओ टीम द्वारे लक्ष ठेवणे अशा टीम तयार करून यांचे पथक तयार करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहिताचे पालन होण्याकरता सर्व निवडणुकीतील यंत्रणा कार्यान्वित असल्याचे यावेळी प्रसाद मते यांनी सांगितले.
COMMENTS