Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘झोपु’ योजनांसाठी आठ वित्तीय संस्थांची तयारी

मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सद्यःस्थितीतील 260 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी प्राधिकरणाने जारी केलेल्या अभय योजनेला आठ वित्ती

निकालानंतर 48 तासांत सरकार न बनल्यास राष्ट्रपती राजवट अटळ : संजय राऊत
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जनता दरबार ठरतोय चर्चेचा विषय…
नामांतराविरोधात 37 हजारांवर आक्षेप

मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सद्यःस्थितीतील 260 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी प्राधिकरणाने जारी केलेल्या अभय योजनेला आठ वित्तीय संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. या वित्तीय संस्थांनी 28 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याची तयारी दाखविली आहे. या योजनांमध्ये वित्तीय पुरवठा करणार्‍या बँका, वित्तीय संस्था यांची अधिकृतपणे संयुक्त विकासक किंवा ऋणदाता म्हणून नोंद केली जाणार आहे. या वित्तीय संस्थांनी नेमलेल्या सक्षम संस्थेमार्फत रखडलेला पुनर्विकास पूर्ण करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. या योजनेतील विक्री करावयाच्या घटकातून या वित्तीय संस्थांना आपला हिस्सा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रखडलेल्या 380 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लागाव्यात यासाठी अभय योजना जारी केली होती. या योजनेनुसार निविदा प्रक्रियेने विकासकाची नियुक्ती करणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत योजना, शासकीय भूखंड क श्रेणीत रूपांतरित करण्याची मुभा देणे व अभय योजना असे चार प्रस्ताव मान्य करण्यात आले होते. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने जून 2022 मध्ये वित्तीय संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. तब्बल आठ वित्तीय संस्थांनी 28 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे.

COMMENTS