राज्यात मध्यावधी निवडणुकांची तयारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात मध्यावधी निवडणुकांची तयारी

खासदार संजय राऊत यांचा दावा

मुंबई प्रतिनिधी - राज्याच राजकारण इतकं अस्थिर झाले आहे की, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याची दिल्लीत तयारी सुरु झाल्याचे संकेत शिवसेना नेते खा

मग आता संजय राऊत ज्योतिषी झाले काय ?
संजय राऊतांनी चाटूगिरी आणि चोंबडेपणा थांबवावा  
कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही; पूर्ण मुलाखत होऊ द्या.

मुंबई प्रतिनिधी – राज्याच राजकारण इतकं अस्थिर झाले आहे की, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याची दिल्लीत तयारी सुरु झाल्याचे संकेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी दिले आहे. जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, असे वक्तव्य देखील राऊत यांनी केले आहे.
प्रत्येक फुटीर गटात एक तरी शिंदे असतो. त्यामुळे शिंदे गटात लवकरच फूट फडेल, असा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच, राज्यात मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरू आहे, असे महत्त्वाचे भाष्यही संजय राऊत यांनी केले. नुकतेच शिंदे गटात गेलेले खासदार गजाजन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांच्यासोबत आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड अस्थिर झाले आहे. त्यामुले शिंदे गटातही लवकरच फूट फडून राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. संजय राऊत म्हणाले, खासदार वडील गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेल्यानंतरही त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर शिवसेनेत राहिले, याचा आम्हाला फार आनंद आहे. 100 दिवसांच्या कोठडीतून सुटून बाहेर आल्यानंतरही मला एवढा आनंद झाला नव्हता. असे असंख्य अमोल कीर्तीकर आज मुळ शिवसेनेत आहेत. हेच शिवसैनिक महाराष्ट्रात शिवसेनेला पुढे नेणार आहेत. अमोल कीर्तीकर म्हणाले, वडील व खासदार गजानन कीर्तीकर यांचा शिवसेना सोडण्याचा निर्णय वैयक्तिक होता. मी मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहे. अशा अडचणींच्या वेळी उद्धव ठाकरेंना सोडून जाणे मला योग्य वाटत नाही. मी कालही उद्धव ठाकरेंसोबत होता. आजही उद्धव ठाकरेंसोबत आहे व भविष्यातही त्यांच्यासोबतच काम करणार आहे. भविष्यात पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवेल, ती पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा मी प्रयत्न करेल. यानंतर संजय राऊत म्हणाले, राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. दुसरीकडे, एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्यातून बाहेर जात आहे. त्यामुळे एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीयांची बैठक घेतली पाहीजे. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

तर, आपण राजकारण करायलाही उरणार नाही – दरम्यान, महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही सल्ला दिला. महाराष्ट्रातून प्रकल्प जात आहेत. यावर कुणीच काही बोलत नाहीये. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत? यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे. पण महाराष्ट्र कमजोर झाला, तर आपण राजकारण करायलाही उरणार नाही याचे भान सत्ताधारी आणि विरोधकांनीही ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.

COMMENTS