Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

सातारा / प्रतिनिधी : सातार्‍यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बु

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय उद्या युवा महोत्सव
राजारामबापू कारखाना अध्यक्षपदी प्रतीक पाटील यांची निवड; उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष विजयराव पाटील
ना. रामराजेंवर टिका करुन दुकान चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न : प्रितसिंह खानविलकर

सातारा / प्रतिनिधी : सातार्‍यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्कांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारल्या. डोक्यात दगड मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत.
मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणार्‍या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून मारहाणीचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे.

COMMENTS