Homeताज्या बातम्यासंपादकीय

निवडणूकपूर्व खलबते !

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला असला तरी, महायुतीला सत्तेत आणण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित श

निर्भयाची पुनरावृत्ती
सोसायटयांचं रुपडं पालटणार
एसटी संपाचा बागुलबुवा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला असला तरी, महायुतीला सत्तेत आणण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्राचे दौरे वाढवले आहे. महाराष्ट्रात अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा निवडणुका लढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यासोबत शहा यांनी या निवडणुकीसाठी विशेष रणनीती आखण्यात आल्याचे दिसून येत आहे. मध्यप्रदेशात देखील भाजपविरोधी वातावरण असतांना संपूर्ण निवडणूक हातात घेऊन शहा यांनी मध्यप्रदेशात भाजपची सत्ता आणून दाखवली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील तीच रणनीती शहा वापरतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे शहा यांना मात देण्यासाठी महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून खासदार शरद पवार यांच्याकडे बघितले जात आहे. कारण राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर देखील त्यांनी नव्या चेहर्‍यांना संधी देत निवडून आणण्याची किमया शरद पवार यांच्यात असल्याचे दिसून येते. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप काही मिटण्याचे चिन्हे नाहीत. कारण शहा यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत शिंदे यांच्या शिवसेनेला 70 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 40 जागा देवू केल्या आहेत. अर्थात हा प्रस्ताव असून त्यावर एकमत झाले नसले तरी, या जागांमध्ये फार मोठी वाढ होईल असेही नाही. त्यामुळे निवडणुकीचा बिगुल वाजेपर्यंत जागावाटपाचे घोडे पुढे जाते की, महायुतीतील एखादा घटक पक्ष बाहेर पडतो, ते स्पष्ट होण्यास अजून बर्‍याच दिवसांचा अवधी आहे. मात्र अजित पवार गटाला केवळ 40 जागांचा प्रस्ताव दिला असला तरी, त्यांना जास्तीत जास्त 50-55 जागांपेक्षा अधिक जागा देणार नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिंदे यांच्या पक्षाला 70-80 पर्यंत जागा देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे अजित पवार गटामध्ये नाराजी वाढण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास फायनल झाल्याचे दिसून येत आहे. कारण काँगे्रस 110 जागा, ठाकरे गट 95 आणि शरद पवार यांना 83 जागा देण्यावर एकमत झाले आहे. मात्र कोण कुठल्या जागा लढणार या जागा असून फायनल झालेल्या नाहीत. त्यामुळे जागावाटपाचे चित्र अजूनही अंधातरीच दिसून येत आहे. शिवाय अनेक जण आमदार होण्यासाठी इच्छूक असल्याचे दिसून येत असले तरी, कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळेल याची शाश्‍वती राहिलेली नाही. त्यामुळे पक्षांतर होणार यात शक्यता नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून कुरघोडी सुरू असतांनाच तिसरी आघाडी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यात मनोज जरांगे पुन्हा एकदा महायुतीसमोर अर्थात भाजपसमोर कडवे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यंदा निवडणुकीमध्ये मोठा सस्पेन्स बघायला मिळू शकतो. शिवाय लोकसभा निवडणुकीत जसे अनेक मातब्बर नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला तसाच तो पराभव विधानसभा निवडणुकीत देखील बघायला मिळू शकतो. विधानसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो, त्यामुळे मंत्रालयाचा चांगलीच लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे घटनात्मक तरतुदींनुसार निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सामान्यतः 45 दिवसांच्या आत नवी विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते. त्यामुळे 13 ऑक्टोबरनंतर केव्हाही राज्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपांवरून बैठका होतांना दिसून येत आहे. मात्र महायुतीमध्ये अजूनही जागावाटप फायनल झालेले नाही, त्यामुळे अजित पवार गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना मतदारसंघात तयारी करण्यासाठी कमी दिवसांचा अवधी मिळण्याची शक्यत आहे. याच शक्यतेमुळे लोकसभा निवडणुकीत या गटांना पूर्वतयारी करता आलेली नव्हती.

COMMENTS