Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा टोला

सहकारी संस्थाचे मोठे जाळे : बाळासाहेब पाटीलमहाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जाळे मोठे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातही जाळे मोठे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रा

अवघ्या दहा तासात मोटरसायकल चोरास अटक
माण-खटावची इंच न इंच जमीन ओलीताखाली आणणार : आ. जयकुमार गोरे
सातारच्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव

सहकारी संस्थाचे मोठे जाळे : बाळासाहेब पाटील
महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जाळे मोठे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातही जाळे मोठे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. त्याबद्दल काहीही हकरत नाही. सहकारी संस्था चांगल्या चालल्या आहेत. प्रवीण दरेकर यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील डेटा हा पेनड्राईव्हमध्ये बसत नसल्याचे म्हटले होते. त्यावर प्रवीण दरेकरांनी जास्त जेबीचा पेनड्राईव्ह घ्यावा, असा टोला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लगावला.

कराड / प्रतिनिधी : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या कारवाईत महाविकास आघाडी सरकाची सूडाची भूमिका निश्‍चित नाही. मात्र, त्यांची तक्रार झाली म्हणून त्यांना राग आलाय. त्यामुळे ते पश्‍चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. अशात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे सहकारातील काम मोठे आहे. सहकार विभागाची माहिती घेत असताना प्रवीण दरेकर यांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा म्हणजे डाटा बसेल, असा टोला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लगावला.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सातारा येथे सहकारी संस्थातील भ्रष्टाचारा संदर्भात वक्तव्य केलेली होती. त्या संदर्भात सहकारमंत्री पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, मुंबई जिल्हा बँकेवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. ते मजूर संस्थांतून निवडून येत होते. त्याबाबत त्यांची तक्रार करण्यात आली. त्याची सहकार विभागाच्या वतीने चौकशी झाल्यावर त्यांना मजूर म्हणून अपात्र जाहीर केले. दरेकर यांच्याबद्दल आप पक्षाच्या शिंदे यांनी सहकार व गृह विभागाकडे तक्रार केली. त्यामध्ये त्यांनी मजूर या व्याख्येत बसून अनेक वर्षे मुंबई जिल्हा बँकेवर काम केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
विधान परिषदेला उभे राहताना प्रवीण दरेकर यांनी प्रतिज्ञापत्रात व्यवसाय म्हणून स्वतःची नोंद केली होती. मजूर म्हणून नोंद केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये राजकीय सूड उगवण्याची महाविकास आघाडी सरकाची भूमिका निश्‍चित नाही. मुळात मजूर या प्रवर्गात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये गुन्हा घडला याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे गृह विभाग आणि सहकार विभागाकडून हा गुन्हा दाखल केलेला आहे.

COMMENTS