Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रथमेश परबचा पार पडला साखरपुडा

मुंबई प्रतिनिधी - मराठी कलाविश्वात सध्या लगीनसराई सुरु आहे. अनेक तरुण कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्यातच सर्वांचा लाडका दगडू म्

मनपा प्रशासनाकडून महाविकास सत्तेवर बॉम्ब?
कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी पाटगाव धरण मध्यरात्री ओहरफ्लो
कृष्णा कारखान्याचा सीएनजी पंप लवकरच कार्यान्वित होणार : डॉ. अतुल भोसले

मुंबई प्रतिनिधी – मराठी कलाविश्वात सध्या लगीनसराई सुरु आहे. अनेक तरुण कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्यातच सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब यानेही काही दिवसांपूर्वीच लग्न करत असल्याची घोषणा केली. आपल्या केळवणाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्याच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. यानंतर आता त्याच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त साधत प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा उरकला आहे. दोघांचा साखरपुडा काल थाटामाटात पार पडला असून या सोहळ्यातील काही खास फोटो प्रथमेशने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं कॅप्शन प्रथमेशने या फोटोंना दिलं आहे. यामध्ये प्रथमेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी साडी नेसली आहे. चाहत्यांकडून या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS