Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतापव ढाकणे यांना आमदार करण्यासाठी कामाला लागा

खासदार निलेश लंके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पाथर्डी ः प्रताप ढाकणे यांना विधानसभेत मी प्रताप ढाकणे ईश्‍वरसाक्ष शपथ घेतो आहे अशी शपथ घेताना पाहायचे असेल तर कार्यर्त्यांनी आतापासूनच आपले गाव

सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गाचे निघाले टेंडर
राहुरी तालुक्यात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव
कर्ज रकमेचा गैरवापर, त्या जमिनीचे व्यवहार थांबवण्याचे आदेश

पाथर्डी ः प्रताप ढाकणे यांना विधानसभेत मी प्रताप ढाकणे ईश्‍वरसाक्ष शपथ घेतो आहे अशी शपथ घेताना पाहायचे असेल तर कार्यर्त्यांनी आतापासूनच आपले गाव सांभाळण्याचे काम करावे .इच्छाशक्ती दांडगी असेल तर काहीही होऊ शकते असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. लंके यांची खासदारपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नागरी सत्कार संस्कार भवन येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रताप ढाकणे, शिवशंकर राजळे, रफिक शेख, राजेंद्र दौण्ड, बंडुपाटील बोरुडे, नवनाथ चव्हाण, योगिता राजळे, नासिर शेख, सुभाष केकाण, माउली केळगंद्रे, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. राजेंद्र शिरसाठ, दिनकर पालवे, रत्नमाला उदमले हे उपस्थित होते.                                      
या वेळी बोलताना लंके म्हणाले की, जे तुमच्या मनात आहे ते माझ्याही मनात असून येत्या विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत प्रताप ढाकणे आमदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून तुम्ही फक्त मला साथ द्या,पारनेर माझी आई तर पाथर्डी माझी मावशी आहे. मोहटा देवीवर आपली श्रद्धा असल्याने आपल्या प्रचाराची सुरवात आपण मोहटा देवीगडावरून केली तर प्रचाराची सांगता सभा सुद्धा पाथर्डीत केली.अवघ्या 14 वर्षाच्या राजकीय जीवनात आपण सरपंच ते खासदार झालो ते केवळ जनतेच्या जीवावर झालो आहोत.लोकांनी ही निवडणूक हाती घेतली  होती.लोकांनी ज्या दुवा दिल्या त्या मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरणार नाही. तालुक्यात पाणीटंचाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न आहेत मात्र प्रशासनाला सोबत घेऊन आपण ते सोडवणार आहोत. ज्यांनी मला मते दिली नाही त्यांच्यावर सूड उगवण्याची काम आपण करणार नाही.देणे वाले का भी भला, न देणे वाले का भी भला हि आपली वृत्ती आहे. मी खासदार झालो यावर माझाच विश्‍वास बसत नाही.विधानसभेला जिल्ह्यातून बारा आमदार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीला उभा राहिलो तेव्हा माझ्या घरच्यांनीच  मलाच वेड्यात काढले होते तर पंचायत समिती निवडणुकीत माझ्याकडे साधा मोबाईल सुद्धा नव्हता मात्र आता खासदार झालो आहे.                                                                                                                            छत्रपतींच्या राज्यात महिलांचा अपमान होतो ते चूक असून कोणीही जातिभेद करू नये तसेच महिला नेत्यांविषयी आदर बाळगण्याचे काम करावे. हा तालुका विचारी लोकांचा तालुका असून स्व. बबनराव ढाकणे यांच्या सारख्या नेत्याने या तालुक्याचे प्रतिनिधित्व केले असल्याचे शेवटी लंके म्हणाले. प्रास्ताविक शिवशंकर राजळे सूत्रसंचालन योगेश रासने तर आभार नासिर शेख यांनी मानले.  

COMMENTS