निस्वार्थीपणे शहरातील समस्या सोडवणारे युवा नेतृत्व प्रशांत शेळके

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निस्वार्थीपणे शहरातील समस्या सोडवणारे युवा नेतृत्व प्रशांत शेळके

अभिजित खंडागळे/ पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेचा कार्यकाळ संपलेला असताना नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यां

सुरेशनगरमध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर उत्साहात
कोठला परिसरात गोवंशीय मांसासह एकास अटक
शेततळ्यात बुडून बापलेकासह भाच्याचा मृत्यू l पहा LokNews24

अभिजित खंडागळे/ पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेचा कार्यकाळ संपलेला असताना नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेळके यांनी स्वखर्चाने अष्टवाडा येथील भूमिगत गटारीचे काम पूर्ण करत नागरिकांची होणारी गैरसोय दुर केली.यावेळी अक्षय वराडे,आकाश भातोडे,गणेश पारेकर, रोनित चिलवंत,सोमनाथ कुलट, प्रतीक वराडे,ओम भालसिंग मुकुंद भालसिंग हे उपस्थित होते.त्यांच्या या कामाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासुन माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेळके यांच्याकडे कुठलेही पद नसताना त्यांनी शहरात निस्वार्थी पणे विविध सामाजिक कामे केली आहेत.कोरोना महामारीत त्यांनी ज्यांच्या हाताला काम नाही अशा गरजूंना किराणा वाटप तर वैद्यकीय उपचारात आर्थिक अडचण असलेल्यांना मदत करत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.तसेच शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळाच्या समस्या ही सोडवण्याचे काम त्यांनी केले आहे. समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी नेहमीच शहरात सामाजिक उपक्रम राबवण्याचे व शहरातील नागरिकांचे समस्यांचे निवारण करण्याचे काम ते करत आहेत.

तरुणांना संधी मिळणे काळाची गरज
शहर विकसित करण्यासाठी प्रशांत शेळके यांच्या सारख्या निस्वार्थी व राजकीय सुसंस्कृतपणा असलेल्या तरुणांना संधी मिळणे ही काळाची गरज आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

COMMENTS