Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात हरघर तिरंगा घरघर तिरंगा उपक्रम साजरा

नेकनूर प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियान अंतर्गत माऊली विद्यापीठ केज संचलित, प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर य

श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू
सरकारी नोकरीत येणार्‍या दिव्यांगांची होणार तपासणी
आतातरी आरक्षणाचा प्रश्‍न सुटेल का ?

नेकनूर प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियान अंतर्गत माऊली विद्यापीठ केज संचलित, प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे आज रविवार दि. 13 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ढास डी.के. यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगान करण्यात आले. ध्वजारोहणाचे संचलन शारीरिक शिक्षण विभागाचज प्रमुख डॉ. जाधव एस. एच. यांनी ध्वज संचलन केले.
या ध्वजारोहण याप्रसंगी बोलताना प्राचार्य ढास डी.के. म्हणाले की, हा शासनाचा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान तीन दिवसांसाठी असून प्रत्येकांनी आप-आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा. हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव व्दिगुणित करावा.  हर घर तिरंगा घर घर तिरंगा हा उपक्रम रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.अंकुश काळे, डॉ. राजेश आरदवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मुजावर एस. टी. व शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. जाधव एस. एच. अंतर्गत घेण्यात आला. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS