Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरंगळेमळा शाळेचा प्रज्वल जेजूरकर हस्ताक्षर स्पर्धेत तालुक्यात प्रथम

राहाता- जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते. नुकत

एमपीएससीमध्ये मोनिका झरेकर राज्यात दुसरी
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अहमदनगर राज्यात तिसरा
शंकर भालेकर यांचे निधन

राहाता- जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते. नुकत्याच राहाता तालुक्याच्या विविध गुणदर्शन स्पर्धा गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांच्या मार्गदर्शनखाली यशस्वी पार पडल्या. अस्तगावच्या आरंगळेमळा शाळेतील प्रज्वल सचिन जेजूरकर याने बालगटात हस्ताक्षर स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेची परंपरा कायम राखली आहे. यापुर्वीही आरंगळेमळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर हस्ताक्षर स्पर्धेत यश संपादन केले आहे. 

           या यशाबद्दल प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नंदुभाऊ गव्हाणे, ग्रामपंचायतीचे सदस्य पवन आरंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे गोकुळ आरंगळे, रंगनाथ आत्रे, संजय आत्रे, एल.आय.सी. प्रतिनिधी गोरक्षनाथ जेजुरकर, मेजर संदीप नळे, अमोलभाऊ आत्रे, अमोल आरंगळे, सचिन जेजुरकर, रवी आरंगळे, विशाल जेजुरकर यांनी प्रज्वलचे अभिनंदन करुन जिल्हास्तराच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याला मुख्याध्यापक गोरक्ष पटारेे, शिक्षक बबन कोकाटे तसेच केंद्रप्रमुख गोरक्षनाथ हासे व विस्तार अधिकारी विष्णू कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांनी प्रज्वलचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS