राहुरी :आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचे धनगर समाजासाठी भरीव असे योगदान राहिले असून, समाजाशी असलेली कौटुंबिक बांधिलकी या नात्याने दिसून येते असे व
राहुरी :आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचे धनगर समाजासाठी भरीव असे योगदान राहिले असून, समाजाशी असलेली कौटुंबिक बांधिलकी या नात्याने दिसून येते असे वक्तव्य यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतांना तमनर म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी होती परंतु सर्व समाज बांधवांनी आग्रह धरला की आपण निवडून येणार नाहीत तर आपल्या तालुक्याची हानी कशाला करता म्हणून प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा देऊन निवडून आणता येईल असे सर्वनुमते ठरले यासाठी अर्ज मागे घेऊन आम्ही पाठिंबा दिला आणि तो प्राजक्तादादांनी सार्थ ठरवला. धनगर समाजाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी या संस्थेस राहुरी नगरपालिकेकडून 10 गुंठे जागा इमारत व विस्तारित बगीचा अहिल्याभवन साठी उपलब्ध करून दिले व अहिल्याभवन येथे पुस्तकासहित,अभ्यासिका व विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रासाठी आमदार तनपुरे कायम सहकार्य व योगदान देत असल्याचे तमनर यांनी सांगितले.
पुढे बोलतांना तमनर म्हणाले की, मुळा धरणातून वावरथ जांभळी,जांभुळबन या गावांना जोडण्यासाठी 110 कोटी रुपयांचा पूल मंजूर करण्यासाठी जलसंपदा खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे पाठपुरावा करून पुलाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून 19 लाख रुपये मंजूर करून ते पूर्ण केले व पुढील काम अंतिम टप्प्यात आणण्यात त्यांचेच मोठे योगदान आहे. यासोबतच वावरथ-जांभळी, जांभूळबन या गावासाठी स्वतंत्र 5.5 कोटी रुपयांचे सबस्टेशनचे काम पूर्ण केले आहे. वावरथ जांभळी या गावांसाठी एक कोटी रुपयांची यांत्रिक बोट मंजूर केली की ज्यामधून चार चाकी वाहनाने बोटीतून प्रवास करता येणार आहे बोटीचे काम पूर्ण झाले असून थोड्याच दिवसात बोट कार्यान्वित होणार आहे.चिखलठाण,मांजरी,वांजुळपोई या धनगर बहुल गावांसाठी स्वातंत्र्य सबस्टेशन कार्यान्वित केले आहे. वावरथ येथील खिल्लार वाडा येथे सभामंडप दिला. वरवंडी येथे शिंगाडे वस्ती येथे सभामंडप दिला असून, घोरपडवाडी येथे 12.5 लाख रुपयांचा बिरोबा मंदिर येथे सभा मंडप दिला आहे. शेरी चिखलठाण येथील सभामंडप दिला, यासोबतच धनगर समाजातील सर्व वाड्या वस्त्यांचा तांडा वस्ती मध्ये समावेश केला. धनगर समाज मेंढपाळ बांधवावरील अन्यायाच्या विरोधात प्राजक दादा तनपुरे कायम समाजासोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरडगाव थडी येथील भाऊसाहेब भिवा गलांडे या समाज बांधवाचे भर पावसाळ्यात वनविभागाने शेती व घर उध्वस्त केले यावेळी आपले मंत्रिपद असताना शासनाच्या विरोधात जाऊन समाज बांधवांच्या पाठीशी उभे राहिले. वनविभागाचा अधिकारी देवखिळे यांच्यावर हक्कभंग आणला. घोरपडवाडी येथील रामा बाचकर यांच्या शेतीवर असणार्या अतिक्रमणाबाबत दोन्ही समाजात बैठक घेऊन धनगर समाज बांधवास न्याय मिळवून दिला. घोरपडवाडी येथील मेंढपाळ भगिनीवर अत्याचार करणार्या मुजोर वनविभागाच्या अधिकार्याचे निलंबन करून गुन्हा दाखल केला. धनगर समाजाच्या घरकुलासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून 17 घरकुल आपल्या राहुरी मतदार संघात मंजूर केले. वन विभागाच्या लगत असणार्या अधिकार्यांशी समन्वय करून पाईपलाईन,रस्ते,पाणी यासाठी अनेकदा बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावले. मेंढपाळ बांधवांना चराईसाठी वनविभाग तसेच कृषी-विद्यापीठ या ठिकाणी कायमचे सहकार्य असते असे तमनर यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS