Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्राजक्ता माळीला सलमान खानशी लग्न करायचं होत

लोकप्रिय अभिनेत्री ते यशस्वी उद्योजिका असा प्रवास करणारी मराठीमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या प्राजक्ताने स

पुण्यात झिका रूग्णांची संख्या 28 वर
राजधानीतील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी
राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

लोकप्रिय अभिनेत्री ते यशस्वी उद्योजिका असा प्रवास करणारी मराठीमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या प्राजक्ताने स्वत:चा प्राजक्तराज हा नवा दागिन्यांचा ब्रँडही सुरु केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या ती सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने अभिनेता वैभव तत्ववादी माझा क्रश होता असं म्हटलं होतं. मात्र, आता वैभव नव्हे तर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता तिचा खरा क्रश होता अलिकडेच प्राजक्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. यात तिचा पहिला फसलेला पदार्थ, पहिल्यांदाच चुकलेला आऊटफिट अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्येच तिने तिच्या क्रशचं नाव सांगितलं. अर्थात तिचा हा क्रश ती लहान असतानाचा होता हे तिने आवर्जुन सांगितलं. तुझा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला होता. त्यावर जराही वेळ न लावता तिने सलमान खानचं नाव घेतलं. मी अगदीच १-२ वर्षांची होती. त्यावेळी माझा आतेभाऊ सलमान खान फार मोठा चाहता होता. त्याने मला शिकवलं होतं, की सलमान खान छान आहे. त्यामुळे मी सारखं म्हणायचे मला सलमान खानशी लग्न करायचंय, असं उत्तर प्राजक्ताने दिलं.

COMMENTS