Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रज्ञा डमाले दहावीत पाथर्डी तालुक्यातून प्रथम

पाथर्डी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा पुणे आयोजित इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत श्

प्रवरा नदी पात्रातून दोन मृतदेह सापडले ; मृतांची संख्या सहा
नगर पोलिसांचा डंका…मिटके व देशमुखांना बक्षिसे
साऊ एकल महिला समितीची अकोल्यात स्थापना

पाथर्डी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा पुणे आयोजित इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या विद्यालयाची कु. डमाळे प्रज्ञा हरिभाऊ 96.60 गुण मिळवून पाथर्डी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डी संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या विद्यालयाचा सेमी इंग्रजी विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील कु.डमाळे प्रज्ञा हरिभाऊ या विद्यार्थिनीने 96.60 गुण प्राप्त करून पाथर्डी तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. याच विद्यालयातील दराडे ईश्‍वरी भागवत या विद्यार्थिनीने 96.40 गुण प्राप्त करून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. परदेशी श्रेया हनुमान सिंग व दराडे ऋतुजा गणेश 95.20 गुण प्राप्त करून संयुक्तपणे विद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयातील 53 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. तसेच विद्यालयातील 167 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गुण (75 टक्के) प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड व व संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशराव आव्हाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्‍वर गायके, पर्यवेक्षक संपत घारे, तसेच विषय शिक्षक अभिजीत सरोदे, रेश्मा सातपुते, संदीप धायतडक, अर्चना दराडे, स्नेहल बोराडे, संदीप आव्हाड, सोनीका वखरे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS