Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अडकला लॅन्डसीडिंग मध्ये शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची स्वराज्य पक्षातर्फे मागणी.

नाशिक प्रतिनिधी - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लॅन्डसीडिंग बाबतची अडचणी सोडवुन अंमलबजावणी करणे बाबत  स्वराज्य संघटना,महाराष्ट्र.ना

कोरोनाचा “डबल म्युटंट स्ट्रेन” लहान मुलांसाठी अति घातक | ‘सुपरफास्ट २४’ | LokNews24
जावळी तालुक्यात रब्बीच्या पेरणीस बैलजोडीला ट्रॅक्टरचा पर्याय
सनी देओलने गुपचूप उरकला मुलाचा साखरपुडा

नाशिक प्रतिनिधी – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लॅन्डसीडिंग बाबतची अडचणी सोडवुन अंमलबजावणी करणे बाबत  स्वराज्य संघटना,महाराष्ट्र.नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने पूर्व विभाग जिल्हाप्रमुख प्रा उमेश शिंदे यांच्या निवेदनावर नाशिकच्या जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. २७ जुलै २०२३ रोजी जमा झालेला हप्ता व त्या आधीचे काही हप्ते मिळण्यापासून शहरी भागातील आडगाव सह शहरी भागातील शेतकऱ्यांना वंचित ठेवले गेले आहे .शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केली आहे.त्यालाच जोड म्हणून महाराष्ट्र शासनाने देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेत मिळणारी लाभ रक्कम इतकीच रक्कम राज्यसरकार थेट बँक खात्या द्वारे मिळणार आहे अशी घोषणा केली आहे.परंतु केंद्र सरकारच्या PM किसान निधी चा लाभ सुरवातीला बऱ्याच शेतकऱ्यांना काही हप्ते मिळालेत परंतु काहीं हप्ते पासून सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून ही लॅन्डसीडिंग असा मॅसेज येत असून सदर बाबतीत काय प्रक्रिया आहे व ती कशी पूर्ण करायची व कोण करणार यांचा खुलासा आपल्या मार्फत व्हावा कारण अशा परिस्थितीत शेतकरी गोंधळात पडले असून त्यांना नेमकं कारण समजत नसून बँकेत चौकशी केली तर बँक अधिकारी,कर्मचारी उडवा उडवीची कारण देतात.तलाठी कार्यालयात उत्तर मिळत नाही त्यामुळे नेमकं कारण समजत नाही.दप्तर दिरंगाई मुळे असे लाभार्थी शेतकरी पीएम किसान निधी पासून हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असेल तर सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आपण जबाबदार संबंधित यंत्रणेला आदेश द्यावा अशी मागणी करण्यात आली. 

आमच्या मागणीचा विचार गांभीर्याने करावा आणि शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाद्वारे आपण आडगाव व नाशिक जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना नाय देण्यासाठी स्वराज्य संघटना व शासकीय अधिकारी,कर्मचारी मिळून एकत्रित उपक्रम राबविला पाहिजे जेणे करून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळेल. आम्ही लवकरच शेतकऱ्यांची बैठक आयोजित करणार आहे त्यात आपले जबाबदार अधिकारी,कर्मचारी यांनी लॅन्डसीडिंग  बाबत मार्गदर्शन किव्हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी आडगाव या ठिकाणी कार्यशाळा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून सहकार्य करावे अशी विनंती जिल्हाप्रमुख उमेश शिंदे यांनी केली आहे . अन्यथा स्वराज्य पक्ष राज्य संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करेल व पुढच्या परिणामास आपण जबाबदार असाल असा इशारा वजा विनंती करण्यात आली. यावेळी निवेदन देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,राज्य कार्यकारणी सदस्य किरण डोखे,पूर्व विभाग जिल्हाप्रमुख प्रा.उमेश शिंदे जिल्हाप्रमुख आशिष हिरे,ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ.रुपेश नाठे,वकील आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख ॲड नवनाथ कांडेकर,कामगार आघाडी जिल्हाप्रमुख दिनेश नरवडे,ज्ञानेश्वर कोतकर,सुदर्शन हिरे,शेतकरी संजय देशमुख,ॲड बाळासाहेब शिंदे,सुमित कडवे,संतोष रोकडे,उपस्थित होते.

COMMENTS