मुंबई/प्रतिनिधी ः अँटालिया स्फोटके प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी वादग्रस्त पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना बुधवारी ज

मुंबई/प्रतिनिधी ः अँटालिया स्फोटके प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी वादग्रस्त पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँटालिया प्रकरणात प्रदीप शर्मा जेलमध्ये होते. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
अँटालिया स्फोटके आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा आरोपी आहे. 2021 मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरूंगात होते. याआधी हायकोर्टाने त्याचा जामीन फेटाळला होता. मात्र, शर्मा यांच्याकडून पुन्हा जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली होती. सुनावणीनंतर कोर्टाने या संदर्भातला निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा हे लवकरच तुरूंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.
COMMENTS