Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शक्ती कायदा लवकर लागू करण्यात यावा

मनसेची जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे मागणी

अहमदनगर ः बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींसोबत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. महिला सुरक्षेशी संबंधित ’शक्ती काय

कोपरगाव काँगे्रसकडून कर्नाटकातील विजयाचा जल्लोष
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात
अंगणवाडी सेविकांचे राज्यस्तरीय आंदोलन

अहमदनगर ः बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींसोबत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. महिला सुरक्षेशी संबंधित ’शक्ती कायदा’ लागू करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित लागू करण्याची मागणी मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देवून करण्यात आली.
बदलापूरच्या शाळेतील या घटनेने जनतेचेमध्ये संतापाचे वातावरण आहे. सदरील शाळा प्रशासनावर व संबंधीत गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाईची यावी, आपण सर्वच महिलांना न्याय देण्याबाबत बोलतो परंतु आजपर्यंत योग्य असा न्याय मिळाला नाही. देशात कुठेही महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात नाही. घराबाहेर मुलं कुठे सुरक्षित असतील तर ते ठिकाण म्हणजे शाळा असते मात्र वरील घटनेत चार वर्षांच्या मुली जेव्हा शाळेत गेल्या तेव्हा शाळेतच त्यांच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. महिला सुरक्षेसाठी मागील राज्य शासनाच्या काळात विधिमंडळाने मंजूर केलेला शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे तरी शक्ती कायदा मंजूर करून तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्रातील शक्ती कायद्या अंतर्गत तपास 15 दिवसांत पूर्ण होईल आणि 30 दिवसांत खटला सुरू होईल. मात्र तो कायदा अद्याप मंजूर झालेला नाही. या बाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मनसेच्या वतीने शहरप्रमुख गजेंद्र राशीनकर यांनी निवेदन दिले. यावेळी मनसे चे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे, डॉ.संतोष साळवे शहर सचिव डॉ. संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष किरण रोकडे, संदीप चोधरी, तुषार हिरवे आदी उपस्थित होते

COMMENTS